अदुःख नवमी
भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. […]
भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. […]
भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
[…]
भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते. […]
विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे. […]
हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात […]
श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी. सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. […]
श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे. सप्तमीचे दिवशी एकभुक्त राहून, अष्टमीला व्रताचा संकल्प करून, पूजेच्या जागेवर फुले, पाने, वेली यांनी वातावरण सुशोभित करतात. तेथेच सूतिका गृह तयार करतात. पूजेच्या चौरंगावर देवकी, श्रीकृष्ण यांची स्थापना करतात. […]
श्रावण मासातील शुक्लपक्षातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केले जाते. कलशावर वरदलक्ष्मी स्थापन करून श्रीसूक्ताने देवीची पूजा करतात. २१ अनरश्यांचा नैवेद्य अर्पण करतात. या व्रताचे फळ व्याधीनाश असे आहे. दक्षिण भारतातदेखील हे व्रत आषाढ महिन्यातील शुक्लपक्षातील अखेरच्या शुक्रवारी करण्याची रीत आहे. -श्री करंदीकर गुरुजी
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions