हयग्रीवोत्पत्ति
श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे. -श्री करंदीकर गुरुजी