आधुनिक परंपरेतील दुवा निखळला
लौकिकदृष्ट्या विजय तेंडुलकरांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी आयुष्य जगण्याच्या महाविद्यालयात त्यांनी अनेक प्रकारचे अलुभव घेतले. हे शिक्षण घेत असताना त्यांना माणसातील माणूसपणांचे आणि त्यांच्यातील पशुत्वाचे दर्शन घडले आणि हेच समाजातील वास्तव त्यांनी आपल्या साहित्यातून मांडले. समाजाला नाटकातून असे जळजळीत सत्य बघण्याची सवय नसल्यामुळे त्यांची नाटके सतत वादाच्या भोवऱ्यात सापडली. […]