नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

दुरत्व

मला अजुनही समजले नाही मला तुझीच आठवण कां येते… तुच सदा माझ्या मनी लोचनी हे कसले, आपुले अगम्य नाते… मी, नित्य इथे संभ्रमात जगतो अस्तित्व तुझे सभोवार भासते… ऋणानुबंध जरी हे गतजन्मांचे मग हे दुरत्व कां मनास छळते… कसले प्रेम? कसल्या भावनां कां? व्यर्थ सारे, जगणे वाटते… तोच एक कर्ता आणि करविता त्यालाच सारे विचारावेसे वाटते… […]

अद्भुत

आता सारे भासते अद्भुत जणु मायाजाल सभोवती हवे ते आता उपलब्ध सारे वेदना एक, दुरावली नाती… आता शोधावी मायाममता दुर्लभ आता वात्सल्यप्रीती कुणास कुणाची ओढ़ नाही वास्तवता ही साऱ्या जगती… मानवता आज कशा म्हणावे भासे अद्भुत सारे कल्पनांती… मरणासाठी कां जगणे असते हा प्रश्न भेडसावतो विचारांती… — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२४८  २६/९/२०२२

प्रारब्ध

शोधावी आत्मसुखदा लाभणे भाग्य भाळीचे वर्तावे जगी वात्सल्ये कुंभ भरावे सत्कर्माचे जगी सर्वसुखी कोण ? दुःख, हेच मनांतरीचे देवांनाही नाही चुकले भोग सारे पूर्वकर्माचे मानवी, जन्म विवेकी जाणुया अर्थ मानवतेचे सुखदु:खांच्या झुल्यावरती जगावे, संचित प्रारब्धाचे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२२१ ३१/८/ २०२२

लोभस नजारा

हा निसर्ग देखणा प्रतिबिंब बिलोरी मन मनास भुलते झुलते प्रीत अंतरी हा लोभस नजारा कोण? हा रंगारी रंगकर्मी रविवर्मा स्वर्गिचा, चितारी रूप अनामिकाचे विलसले चराचरी हा डोह प्रसन्नतेचा इथे डूंबावे निरंतरी — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२४७ २५/९/२०२३

चैतन्य

भास्करा हेच चैतन्य तुझे चराचराचाच श्वास आहे उदय,अस्त, प्राची, पश्चिमी कांचनकेशरी रंग तूच आहे सूर्यचंद्र, ग्रह, तारे, तारका तूच एक प्रकाशसत्ता आहे सारीच मनभावुक प्रसन्नता केवळ तुझीच देणगी आहे तूच सूर्य, सृष्टी जगविणारा देवत्वाचा साक्षात्कार आहे ब्रह्मांडी, कालचक्र अविरत जगण्यासाठी अनिवार्य आहे सुखनैव, मन:शांती जीवा तेजोमय प्रकाशमंडल आहे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २२० ३०/८/२०२२

सांगाती

सरूनी गेले जीवन सारे उरल्या केवळ गतस्मृती जिथे जावे, तिथे तिथे वाटते तुच आहे सांगाती अजुनी उभा तोच पिंपळ सांगतो गं तुझ्याच स्मृती सरितेची शांत झुळझुळ तीरावरती तेवती ज्योती वाळूत ठसल्या पाऊलांतुनी छुमछुम छंदी पैंजणे नादती भास, तुझाच होई अनावर वाटते आहेस तू सदा सोबती ऋणानुबंध सारे प्रीतभारले स्पंदनी झरते लाघवी प्रीती आत्मानंद हा खरा जीवाला […]

सत्य आत्मा

आता क्षणक्षण येणारा नित्य आनंदात जगावा जन्म हीच कृपा ईश्वरी प्रारब्धा झेलित जगावा जे भोगले तेच सुख होते दुःखाचा लवलेश नसावा जरी कुणी कसे वागले संयम विचारी राखावा समजावित मनांतराला विवके, जन्म सावरावा संचिताचा, कर्मसोहळा याची देही डोळी पहावा जन्मासवेच अटळ मृत्यु अर्थ जीवनाचा जाणावा सृष्टितील श्वास मर्त्य सारे एक आत्मा सत्य जाणावा — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

आत्माराम

श्वासातुनी चिरंजीवी गंध तुझा मखमली मयुरपिसी स्पर्श तुझा तुच वेल सुकुमार या जीवनाची कोवळ्या फुलांतुनी भास तुझा पाकळी, परागकणी मकरंद तूं निर्मळ सौंदर्यी साक्षात्कार तुझा अंतरी तुच गंगौघ प्रीतभावनांचा स्पंदनांनाही अविरत ध्यास तुझा तुझे रूप असे स्वर्गसुंदरी सारखे जणु निरागस ईश्वरीय अंश तुझा ब्रह्मांडी हेच सत्यं शिवं सुंदरम तिथेच रमतो आत्माराम हा माझा — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

जीवलगा

सखया, किती वेळ मी वाट तुझी पाहू रे…. जाहली तिन्हीसांजा गाभारी दीप दीपले रे… नको आता जीवघेणी असह्य ती, प्रतीक्षा रे… जीवलगा, जीवलगा किती पाहू मी वाट रे… तुलाच भेटण्यासाठी कासावीस हा प्राण रे… ये नां, सत्वरी धावत बघ झाकोळले गगन रे… ******* –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२१७ २७/८ /२०२२

हळहळ

सांग नां ! आतातरी नाते तुझे नी माझे…. क्षण मी विसरु कसे प्रेमात हरविले माझे…. आज मी इथे, तू इथे तुज शोधिते मन माझे…. भास तुझाच अंबरात त्यात गुंतले श्वास माझे…. क्षिणली, सारीच गात्रे व्याकुळले हृदय माझे…. आज अधीर लोचनी तूं हळहळते अंतरंग माझे…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. २१८ २८/८/२०२२

1 11 12 13 14 15 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..