नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

मोहविते मनास माझिया

मोहविते मनांस माझिया क्षितिजावरची सांज सुंदर जीवनाचे प्रतिबिंब मनोहर स्मृतीत रंगले केशरी अंबर किती, काय कसे स्मरावे अव्यक्त प्रीतीचे नाते सुंदर रेंगाळलेली, सांज लोचनी मोहविते मनांस नीळे अंबर सुख, दु:खांची ऊन सावली भावनांचेही घुटमळणे सुंदर ओढ़ मनांतरी सत्य प्रीतीची हॄदयी, नाचतो मनमोर सुंदर — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २४५ २३/९/२०२२

कासाविस पाझर

मन हे वेडेच वेडे माझे कसे समजावू या मनाला वात्सल्यप्रीत अनिवार्य जीवा त्याच्याच ध्यास सदा जीवाला लळा, जीव्हाळा दैवदान ऋणानुबंधी लाभतो मानवाला संचिती मोहोळ आठवांचे जगविते नित्य मनांतराला कासावीस ओघळ पाझरांचे सांगा कसे समजावू मनाला वेदनांचा आकांत अंतरी सुन्न करितो व्याकुळ जीवाला — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२४२ २०/९/२०२२

अस्तित्व

अस्तित्व तुझे सभोवार सर्वत्र तुझाच स्पर्शभास वात्सल्य तुझे लडिवाळ माते तुझाच अंतरी ध्यास….. तुझ्याच कुशीत स्वर्गसुख पान्हा, तुझा अमृती घास तव आशीष कवचकुंडले आठवे तुझे रूप निरागस….. सत्य! तुच जननी सृष्टिची निरपेक्ष तुझाच गे सहवास आज अंतरी अस्तिव तुझे मज सावरिते क्षणाक्षणास…. साक्षात, तुच गे देवदेवता तुझ्या, उदरी ईश्वरीय वास मातृत्व! एक ब्रह्म शुचिता लाभते जन्मी […]

दृष्टांत विवेकी

मनाचिया, शांत डोही पर्जन्यबिंदू, भावनांचे… स्वाती, नक्षत्रांत पड़ता मोती होती शब्दफुलांचे… गीतात मधुर प्रीतचांदणे निष्पाप स्पर्श भावनांचे… हितगुज अव्यक्त अबोल सहजी उमलते अंतरीचे… शब्दात गंधाळ भावनांचा जीवनी श्वास सारे सुखाचे… सभोवार तृप्तीचे कारंजे दृष्टांत, विवेकी चिंतनाचे… मनाचियाच, शांत डोही परिस्पर्ष सारेच धन्यतेचे… –वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. २१९ २९/८/२०२२

उलघाल अशाश्वताची

आज माणुस शोधून सापडत नाही सापडला तरी मानवता दिसत नाही सारं काही कृत्रिमतेनं नटलेले आहे निर्मल प्रेमभाव कुठे जाणवत नाही नाती, सुंदर हलक्या फुग्यासारखी कधी फुटतील त्याची शाश्वती नाही संस्कार ! फक्त स्वार्थासाठी जगावे भौतिक जगात नातेच राहिले नाही कलियुगी हात ओला तर मैतर भला दातृत्वी भावनां कुठेच उरली नाही संवाद केवळ आता फक्त व्यवहारी आत्मीयता, […]

घरपण

दगड़ा मातीच्या विटांनी उभारलेल्या चार भिंतित मनातलं घरपण सजलयं फुलदाणीच्या फुलांफुलात….. सुखाला शोधित शोधित दुःखांना निवारत निवारत जणु सप्तरंगली सावलीच उतरलीय नभातून अंगणात…. पण मन माझं भिरभिरतय एकटंच निरभ्र नभांगणात उरि, प्रारब्धाला कवटाळत गुंतलय ऋणानुबंधी पाशात…. काळ, झरझर सरतो आहे मनामनांत, मनेही गुंतलीत सारं काही छान होणार आहे हा भाव जपला आहे अंतरात…. — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

स्वर्गसुखदा

तुला पाहता मी मज हरवुनी जाते विसरुनी सारे, तुझ्या रुपात रंगते… अंतरी, वेड प्रीतीचे लडिवाळ लाघवी तुला आठविता, सारे भुलुनी जाते… स्पर्शात तुझ्या ते स्वर्गसुख आगळे निर्मलतेच्या भवसागरी मी अविरत डुंबते… क्षणक्षण भावप्रीतीचे अधीर आसुसलेले अथांग प्रीतसागरी मी तृप्त सचैल नाहते… –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२१५ २४/८/२०२

तृप्तलो आता

मालवुनी टाक रे, दीप तू आता मन शांत जाहले, तृप्तलो आता.. उजळल्या अंतरी, नाना गतस्मृती थकलो स्मृतींचे, भार पेलता पेलता.. कोवळी मध्यान्न, गेली सांजाळूनी सांजेसवे लपली, यामिनीच आता.. निवता लोचने, हुरहुर स्पंदनांना चैतन्य सरता सरता जागे अंतरात्मा.. मालवुनी टाक रे, दीप तू आता.. मन शांत जाहले, तृप्तलो आता.. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२३९ १८/९/ २०२२

वैभव शब्दांचे

मी मनामना जोडित राहिलो.. मी माणसा माणसात राहिलो… नाही कधीच क्षणभर थांबलो नाही कुणास बोचलो टोचलो… जग सारे मायबाप बंधुभगिनी समजुनी जगती जगत राहिलो… काय मिळविले, काय हरविले या विचारात न मी कधी गुंतलो… देणे घेणे हिशेब सारे संचिताचे असे समजुनी समाधानी राहिलो… वैभव! शाब्दिक प्रेमभावनांचे मीच सदोदित मिरवित राहिलो… तळहातांच्या ठळक रेषामधुनी मीच मन:शांती शोधित […]

स्पर्श जाणिवांचा

येता पहाट चैतन्याची जीव अलवार जागतो प्रसवता किरण रविचे आत्मा, ब्रह्मांडी रमतो… स्पर्श जाणिवांचा नित्य मनभावनांशी खेळतो इच्छा प्रत्येकाची वेगळी जो तो स्वसुखा शोधतो… कालचक्र हे पूर्वकर्माचे जीव नित्य इथे भोगतो क्षण सारेच अनोळखी ओंजळीत झेलित राहतो… जीवाजीवा उद्याची चिंता हा बेभरोसा असह्य होतो नियती चक्र सांजाळणारे अंतरी अंधार दाटुनी येतो… –वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र.२१० […]

1 12 13 14 15 16 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..