चक्र ऋतुंचे
जगायचे ते जगले नाही काही राहीले श्वासही भगवंताचे नाही काही आपुले जन्म, मृत्यु प्रवास ते भ्रमणही आपुले बाहुले, कळसूत्रीचे चक्र ऋतुंचे चालले दशदिशा भारलेल्या नेत्री दृष्टांत रंगलेले भोगणेच संचिताचे या जन्मी लाभलेले पसरूनी दोन्ही बाहु क्षणक्षण ते झेललेले हेच सत्य साक्षात्कारी अस्ताचली सांज रंगले — वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१७४ २०/७/२०२२