कृष्णमेघना
झाकोळल्या नभांगणी कृष्णमेघना अनावर… जीवा, ध्यास श्रावणी सरसरसर धारा सुंदर… वर्षा ऋतू बरसणारा स्पर्श ओलेता मनोहर… शब्द गझला अर्थवाही भावगंधी ओंजळ सुंदर… चिंबचिंबली पानफुले झुळझुळतो नाद सुंदर… अतर्क्य रूप चैतन्याचे लावण्य रुपडेच मनोहर… नाचत नाचत येते वर्षा ओथंबलेले गगन सुंदर…. ******** रचना क्र. ७८ २०/७/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908