एकांताच्या गुढ किनारी
एकांताच्या गुढ किनारी वादळ आठवांचे घोंगावते आयुष्य सारे सारे हिशोबी अलवार अंतरात उलगड़ते क्षणाक्षणांचे स्मृतीकारंजे भारूनी नभांगणा सजविते नीरव , नि:शब्दी नीरवता मन , मनान्तराला सावरीते सृष्टिचे रूप सुंदर मनोहारी लोचनातुनी अविरत तरळते लडिवाळ , लहर प्रीतरंगली शब्दागंधल्या गीतास गुंफिते एकांताच्या या गुढ किनारी मुग्धगीत मनांतरा भुलविते — वि. ग. सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १४४. […]