मुखवटा
मुखवटेच सारे रंगबिरंगी खेळ, लीलया भावनांचा भेटतात मुखवटे पांघणारे हा अनुभव या जीवनाचा। अनभिज्ञ, सारीच मनांतरे नात्यातही भाव संभ्रमाचा निकोप, निर्मलता संपली स्वार्थी, हव्यास जीवनाचा। भेटो, निरपेक्ष सत्य मुखवटे दरवळावा गंध प्रीतभावनांचा हीच सुखदा सदानंदी चिरंतन रुजावा, बीजांकुर मानवतेचा। — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 दिनांक :- १२ – ४ – २०२२