नभ प्रीतीचे
नभ तव स्मृतींचे, ओघळते लोचनी वाटते तुझ्या प्रीतीत विरघळूनी जावे ठोके स्पंदनाचे दंग तुझ्याच आठवात सभोवार दूजे काय आहे मला न ठावे मनमंदिराच्या गाभारी तुझीच गे मूर्ती निरंजनी दीपणारे तव रूप मज भावे अजूनही अंतरी निनादते राऊळ घंटा तुझी, पाऊल प्रदक्षिणा श्रद्धा जागवे जणू तूच राधा मीरा भक्तीत दंगलेली निरागस त्या भक्तीरुपात हरवूनी जावे कशा, किती? […]