पाहुणचार
जीव भुलोकीचा पाहुणा अनिश्चिती,या स्पंदनांचा संपता, पाहुणचार दैवी घेतो जगी निरोप सर्वांचा।। गतजन्मांचीच सारी नाती याच जन्मी, ऋणमुक्तीची चित्रगुप्ताच्याच चोपडीत चोख हिशेब सारा सर्वांचा।। सलोख्याने ऋणमुक्त व्हावे निजानंदी! निजसुख घ्यावे निरपेक्षी सुखदा ही आगळी मना ध्यास असावा मुक्तीचा।। जीवनी, सुखरूपताच शांती निर्मोही! प्रीतीस्पर्श सदानंदी वरदान! कृपावंती तेच ईश्वरी श्रद्धाभाव रुजवावा भक्तीचा।। — वि. ग. सातपुते.(भावकवी) 9766544908 […]