नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

कृपा दयाघनाची

हॄदयस्थ ब्रह्म.! नित्य नांदते आहे! अंतरीचे भावशब्द स्वरी गुंफले आहे! स्वरात मी दंगलो भान हरपलो आहे! आलाप गंधर्वांचा षड्जाचाच आहे! अव्यक्त प्रीतीभाव शब्दी सांडले आहे! तृप्त मी, तृप्त मी जीवन सुखद आहे! लाभले सारेच संचिती दान आहे! कृपा दयाघनाची मीही कृतार्थ आहे! — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. १६३. २७ – १२ – २०२१.

क्षण हरविलेले

जरा विसावुया! क्षणभर येथे स्मरुया , क्षणक्षण हरविलेले आणि सावरू! क्षण उरलेले जरा विसावुया! क्षणभर येथे ।।१।। आठवांना! किती उसवावे उलगडतांना सुख,दु:खांना लोचनांनी किती ओघळावे जरा विसावुया! क्षणभर येथे ।।२।। आयुष्य सारेच रंगलेभंगलेले तरीही आपण जगलो विवेके दयाघनाची , ती ईच्छया सारी आता विसावुया! क्षणभर येथे ।।३।। प्रीतच आपुली , ऋणानुबंधी स्पंदनी! नित्य उमलुनी येते गंधाळुनी […]

आत्मशांती

आत्माराम हा पांडुरंग माझा अंतरीचा हाच विश्राम माझा।।धृ।। सदानसदा चालतो सांगाती सदासर्वदा देई मज सन्मती जागवितो, जगदिशा अंतरी कृपाळू हा आत्माराम माझा।।१।। जगत , व्यवहारी तो रमतो सत्कर्माची चाल चालवीतो निष्काम! सत्यरुप दावितो निर्विकार , आत्माराम माझा।।२।। जन्मूनीही , मरणच जीवाला व्यालेले , हेची सत्य सृष्टीला स्मृतीगंध तो सात्विक गंधावा सांगतो आत्माराम हा माझा।।३।। सत्यात वाहते […]

तुझीच आठवण दाटूनी येते

तुज कितीही, विसरु म्हटले तरी तूंच गे सदैव, लोचनातुनी तरळते निक्षूनीया,कितीही ठरविले तरीही आठवण अंतरी, तुझीच गहिवरते. असे कसे, कां? घडते,उत्तर नाही सत्य! हेच मनीचे हळुवार उमलते विसरणे तुजला कदापि शक्य नाही प्रीतदान! हे ईश्वरी, मला जगविते मनहृदयी भावगंधली निष्पाप प्रीती औक्षवंती! गीतातूनी मज भुलविते जलावीना! मत्स्यगंधा कां जगते? प्रीतीविना कां जगती जगणे असते जरी दूरदूर […]

अर्थ जीवनाचा

ऋणानुबंधी! नाते हे गतजन्मांचे अलवार, उमललेले जीवाजीवांचे जसे दृष्य लोचनी क्षणाक्षणाला क्षितीजावरती! मिलन नभधरेचे अनाकलनीय! सारेच रूप सृष्टीचे अस्तित्व! सप्तरंगलेले दयाघनाचे मुक्त खळखळणारी सरिता निर्मल तांडव! सरोवरी महाकाय लाटांचे अलौकिक! सारीच साक्ष लाघवी मनोहारी अवीट नजारे ऋतुऋतूंचे मृदगंधी गंधाळुनी जातो जीव सारा सरितेचे, निर्मल तरंग सारेच प्रीतीचे आत्ममुखता! हाच अर्थ जीवनाचा सांगुनी जाते, ते भ्रमण ऋतूचक्रांचे […]

अव्यक्त गूढ

मनहृदयी! अव्यक्त गूढ जीवनाचे तडजोड! जीवनात आव्हान आहे। सत्य! केवळ मनांतरी साक्ष बिलोरी जगणे सुखानंदी, संचिती दान आहे! ध्यास जीवाला जगावे मनासारखे प्रारब्धाचे, भोग भोगणे भाळी आहे। जगणे अवघड, तारेवरची कसरत हवे ते कां ? कधीतरी गवसले आहे। जीवाजीवांचीच, अंतरी खंत बोचरी क्षण! दुःख,वेदनांचे कर्मफल आहे। जन्म! जे लाभले तेच भोगण्यासाठी तडजोड! जीवनात आव्हान आहे। जगणे! […]

आनंद सोहळा

माहोल हा प्रसन्नतेचा तृप्त! कृतार्थ लोचने आभाळ सप्तरंगलेले ब्रह्माण्ड! सारे देखणे। मनांतरी, मीरा! राधा! कृष्ण! कृष्ण! अंतरी हृदयांतरी, माधुर्यभक्ती मंत्रमुग्ध! नाद सुस्वरी। निरभ्र! या निलांबरी लपंडाव, भास्कराचा साक्षी! लोभस निसर्ग खेळ हाच दयाघनाचा। रूप! निरागस निर्मल भाव! मधुरम मधुरम नेत्री कनवाळू कैवल्य मुक्ती मोक्षाचा सागर। सांजआभाळ, तुष्टलेले मेघ आठवांचेच लोचनी भास! सोज्ज्वळ हृदयी ब्रह्मानंदी सोहळा जीवनी। […]

नुरली नाती जगती

नुरली ,जगती कुठलीच नाती आता प्रेम जिव्हाळा वात्सल्य संपले आता सारासाराच आता भासतो दिखावा सुंदरताही , रमली कृत्रिमतेत आता खरी सुखदा , खरे सौन्दर्य संभ्रमात कलियुगी, मृगजळाचीच ओढ आता माणुस ! माणसाचेच निर्दयी खेळणे निर्माल्य ! कोवळ्या फुलांचेही आता कुठल्या रूढी आणि कुठल्या परंपरा निर्बंधीच साऱ्यांचेच इथे जगणे आता स्वार्थी ! बेछूट प्रीतभावनांची दुनिया नको कुणीच […]

मोक्षमुक्ती

भाळी ! असावे दान जीवाला विवेकी ! संस्कारी सहवासाचे जन्मदात्यांच्या , मंगल उदरी प्राशावे अमृतघट सात्विकतेचे जन्माजन्मातुनी जन्म मानवी वैभवी सुखदा , दान संचिताचे सत्कर्माची नित्य कांस धरावी नीतिमूल्य ! जपावे मानवतेचे हवेत कशाला ते दुष्ट हेवेदावे रुजुदे , ऋणानुबंध वात्सल्याचे जगणे केवळ बुडबुडा क्षणाचा मिथ्याच जीवन ! सत्य युगाचे लाभावी , गुरुकृपाच आगळी शापित ! […]

हिशेब

सुखदुःखाचा , मी कधीच गणिती हिशेब नाही केला जीवा जगविता , जगविता कधी अट्टाहास नाही केला वेदनांतूनही शोधीता सुखा दुश्वास कुणाचा नाही केला सुखसमाधान, योग भाळीचे त्याचा हव्यासही नाही केला निर्मळी ! सहवासात लाभले संस्कारांचे रांजण सोबतीला आघातातही डगमगलो नाही विवेके , सावरले मनांतराला खेळ सारेच त्या अनामीकाचे ना कधी विसरलो दयाघनाला — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना […]

1 31 32 33 34 35 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..