नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

निर्मोही गंगामाई

ही पुण्यदा गंगामाई हिचाच अगम्य डोह डुंबता मनी प्रसन्नता तिचाच मजला मोह सुखदुःखा गिळूनिया अविरत तिचा प्रवाह नाही कुणाचाच द्वेष तिचाच मजला मोह ती विरक्तीचा सागर तिच्यात शमतो दाह ती भगिरथाची गंगा ठायी तिच्या निर्मोह जीवनांतीगंगोदक दृष्टांत मुक्तीचा सोहं! (सोहं — ब्रह्मानंद!) — वि. ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र.१५०. १३ – १२ – २०२१.

निमिष एकची मजसी पुरे

अजुनही, तुझाच चेहरा माझिया, बंद लोचनात प्रतिबिंब तुझे सोज्ज्वळ निर्मळ माझ्या काळजात सत्यसाक्षी तूच अनामिक हृदयस्थ! तूच तूं एक प्रीत जिथे पहावे, तिथे तूच तूं भास, तुझाच गे ब्रह्मांडात मी इथे, तर तू त्या सलीली प्रीतगंगा, दुथडी प्रवाहात मी डुंबतो सचैल प्रीतडोही निरंतर, तुझ्याच आठवात निमिष! एकची मजसी पुरे तव दर्शनाचे, या जीवनात — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 […]

खंत अंतरीची

घडेल मनीचे,असेच वाटले होते ते तर कधीच, काही घडले नाही सरला, जरी भयाण काळोख तरी, सभोवार उजाडलेच नाही उरी,कृतार्थतेची आंस निर्मळी परी, कृपावंत गवसलाच नाही झाल्या घायाळ साऱ्या भावनां अर्थ जीवनाचा कळलाच नाही भासले होते सारेच सारे आपुले व्यर्थ सारे, ही खंत सरली नाही सत्य! कलियुगाचे हेची शाश्वत मानवताच, जगती रुजली नाही राम कृष्णही इथेची होवूनी […]

प्रीतभाव

शब्दसागर! दान सरस्वतीचे उमलते निष्पाप हृदयांतरात आभाळ! सारे प्रीतभावनांचे विरघळे, अलवार भावप्रीतीत मनगर्भी! काहूर, संवेदनांचे मी शोधतो, सुगंधा स्पंदनात माळीता, हृद्य क्षणाक्षणांना मंत्रमुग्ध! प्रीतभाव अंतरात तव स्मरणी, भावस्पर्श रेशमी गात्रागात्रातुनी, ओसंडते प्रीत गगनी मी भुलावे अन तू लपावे खेळ, आगळा चालला अविरत तो मोगरा, गुलाब, बकुळ, चाफा दरवळतो धुंद अजुनही अंतरात भावप्रीतिच्याच, महाकाय लाटा गुंफितो मी […]

दयाघना नको आता पुन्हा येरझार

दयाघना नको आता पुन्हा येरझार।।धृ।। ध्यास! केवळ आता तव दर्शनाचा सुखावला या जन्मी जीव हा अपार भोगले भोग, सारेसारे गतजन्मांचे जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।१।। सांगशील कां ? तूं रे जगतनियंत्या सत्य! तुजविण दूजे कोणते सुंदर? धावलो संसारी सदैव मृगजळापाठी जगन्नाथा! नको आता पुन्हा येरझार।।२।। सत्य त्रिलोकी! तुझीच सत्ता केवळ सृष्टीतही साक्षी, तुझेच रूप निरंतर अविरत […]

जन्म मानवी

दु:खांना सहजी झेलित झेलित मी सुखांना कुरवाळीत राहिलो सहवासातील क्षण सारेच सुंगंधी सुखानंदा नित्य उधळीत राहिलो।।१।। उलघाल जरी अंतरी संवेदनांची विवेके, संयमी सुखात राहिलो दान! जीवनी सारेच दयाघनाचे प्रारब्धा, उमजुनी जगत राहिलो।।२।। अनंत जन्मातुनी हा जन्म मानवी सुसंस्कारी सत्कर्म करीत राहिलो मनामनांनाच जगती सांधित जावे भावना! हीच उरी जपत राहिलो।।३।। जीव! हा नकळत जातो सोडुनी सत्य! […]

प्रीतिज्योत

सखे कसे सांगू शल्य अंतरीचे श्वास तुजसाठी व्याकुळ आहे नित्य आलिंगीतो तुला अंतरात मन हळवे तुजसाठी झाले आहे तुझ्या आठवांचे ओघळ लोचनी सभोवती तुझाच सारा भास आहे विरहात तव अस्तित्वाची सुखदा मी ,आजही मौनात भोगतो आहे स्मरती बकुळफुलांच्या ओंजळी तव स्पर्शाठवात मी गंधतो आहे प्रारब्ध ! भोगले दैवयोग समजूनी सांजवेदीवरी दर्शनाची आंस आहे आज याविण दूजी […]

समाजातील जड़णघडणीत संत साहित्याचे योगदान

संतसाहित्यवाङमयनिश्चितच सामाजिक स्तरावर , समाजाच्या जडणघडणीवर तसेच समाज कल्याणाच्या विचारांनी प्रेरित असून सत्य मानवी धर्माची! मानवी नीतिमूल्यांची! जाणीव करून देणारी अवीट अविरत प्रवाही वांग्मयीन गंगोत्री आहे. […]

कोलाहल

कसा ? व्यक्त करावा कोलाहल मनभावनांचा विषण्ण व्याकुळ उसासे दृष्टांत ! सत्य जीवनाचा ।।१।। मूक भोगणे मनगाभारी वास्तव ! हेच जीवनाचे श्रद्धा , अश्रद्धांचेच द्वंद अकल्पी दृष्टांत जीवनाचा ।।२।। सत्य ! असत्य ! संभ्रमी उद्दिष्ट सारेच स्वस्वार्थी जाहल्या बोथट संवेदना निर्जीव अर्थ जीवनाचा ।।३।। कुणीच कुणाचे नसते ब्रह्माण्ड ! मृगजळ सारे जगणेच केवळ फुकाचे ध्यास उगा […]

सात्विक सुखानंद

सालंकृत सुवर्णालंकारांनी सुशोभित झालेलं सौन्दर्य हे बाह्यरुप असतं ! तर सोज्वळ , सात्विक आचार , विचार , भावनांनी सजलेलं रूप हे आत्मरूपी अंतरंग असतं.!! […]

1 32 33 34 35 36 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..