नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

आली आली आली दीपावली

सप्तसुरांचा जसा गंधार राजा सण दिवाळी , हा सणांचा राजा अविवेकाची विझवीत काजळी आनंददीप उजळीत सुखदा आली ।।१।। स्वर्ग ! त्रैलोक्याचा जणू अवतरला दिप नभांगणीचेच सजवीत धरेवरी अमंगळा सारुनी महन्मंगला आली उधळीत आनंदाला दीपावली आली ।।२।। क्षण क्षण , अत्तरी सुगंधात नाहला प्रीतवात्सल्ये ओवाळीली निरांजने दारी , अंगणी रंगली सडा रांगोळी दीवाळी ऐश्वर्यसुखदा घेऊनी आली ।।३।। […]

स्मृतीलहरींच्या हिंदोळी

स्मृतीलहरींच्या हिंडोळ्यावरी तनमन झुलते , हरिच्या गोकुळी।।धृ।। ब्रह्म ! मुरलीधरी हरि सावळा मधुरम , मंजुळ घुमवी बासुरी प्रसन्न ! गोकुळी राधाच बावरी छुमछुम , छुमछुम छंद गोकुळी।।१।। नादब्रह्म ! चराचरी हरेगोविंद हरे , हरेराम , रामकृष्णगोविंद हरिकृपाच ! तोषवीते आगळी देवकीनंदन यशोदेच्या गोकुळी।।२।। प्राजक्त ! डुले सत्यभामा द्वारी सडा फुलांचा रुक्मिणी अंगणी प्रीतीच निर्मळ , देवत्व […]

जगलो कसा किती?

जगी मी जगलो कसा कळले नाही पण भोगले ते कधी विसरलो नाही आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो तो सहवास लाघवी विसरलोच नाही भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान दोष! कधीही कुणाला दिलाच नाही लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला हताश होऊनी […]

सांत्वनी दुःखहारी

दुःखवेदनाच ! सखी खरी । आठवांतुनी झुळझुळणारी । मुक्त हृदयांतरी बिलगणारी । सत्य ! स्वसांत्वनी दुःखहारी ।।१।। दुःखाचे पावित्र्य ! आगळे । ते कां? सहचजी, उमगते । सुखदु:खाचे दान भाळीचे । भोग भोगणेच ! जन्मांतरी ।।२।। अनाहत लाठी भगवंताची । ऋणानुबंधीच साऱ्या गाठी । तोच जोडितो,तोच तोडितो । जपुया ! सत्कर्माची शिदोरी ।।३।। जन्मा ! येताजाता […]

जन्म मानवाचा

जीवन, जगण्यासाठी जीव, आतुरलेला आहे जन्म! हा मानवाचा विवेकी जगायचाआहे ऋतूऋतूंचे आविष्कार निसर्गाचे वरदान आहे नाती सारी ऋणानुबंधी भावप्रिती! साक्ष आहे अंतरी लळा जिव्हाळा प्रारब्धाचे वरदान आहे शिरी आभाळ नक्षत्रांचे मनस्वी सुखशांती आहे निर्मोही स्पर्श भावनांचे स्वर्गसुखाची नांदी आहे जगता जगता जगवावे मानवी नितीमुल्य आहे येताजाता रिक्त ओंजळी अंतिम नग्न सत्य आहे सदा भजावे अनामिका तो […]

कोजागर

हा चंद्रमा शारदीय पौर्णिमेचा शीतल चंदेरी प्रीतचांदण्यांचा साक्ष कोजागरती कोजागरती स्वर्गीयस्पर्श अश्विनी पौर्णिमेचा ।।१।। गवाक्षातूनी खुणावतो चंद्रमा मनआभाळी चांदणे नक्षत्रांचे धुंद बेधुंद, दरवळते रातराणी प्रीतगंधाळ तो अवीट सुगंधाचा ।।२।। तनमनी रमती गतस्मृतींचे रावे निरवतेत अबोली रात्र धुंदवेडी बरसते, शुभ्र चंदेरी कोजागिरी जागर! पुनरुपी प्रीतभावनांचा ।।३।। दुग्धपान!अमृती मनोमिलनाचे सौख्यानंदी पुण्यपावन सोहळा ज्येष्ठत्वाचे हृद्य स्मरण संस्कारी आदर्श हाच […]

प्रतीक्षा

आता जगणे अंगवळणी पडले जगी मी डोळे झाकुनी चालतो टाळुनीयाच वेडीवाकडी वळणे सन्मार्गावरी, सावरूनी चालतो शब्दाशब्दांचे अर्थ सहज जाणतो जर दिला शब्द कुणा तो पाळतो ऋतुऋतूंचा, जरी असे बेभरोसा कालचक्र भाळीचे, निमूट झेलतो जरी उध्वस्त स्वप्ने सारी अंतरीची गुच्छ आशांचे मी हळुवार गुंफीतो हृदयांतरी सुगंधाच्याच अत्तरकुपी माझ्याच भावगीतातुनी मी हुंगतो लोचनी सांजळलेली तिन्हीसांजा त्या सोज्वळ निरांजनी […]

मर्मबंधी रेशीमगाठी

बेधुंद दरवळता गं गंधबकुळी अजूनी होतो सारा भास तुझा मनहृदयी अलवार बिलगणारा अविस्मरणीय, तो स्पर्श तुझा किती? काय? कसे स्मरावे धागे आठवांचे किती उसवावे मर्मबंधीच साऱ्या रेशीमगाठी उलगडता, सहजी भास तुझा भावगंधले ते स्पर्श मयूरपीसी अव्यक्त! सारे झरते शब्दांतूनी उमलताच लाघवी प्रितकळ्या लोचनी घट्टमिठीचा भास तुझा ब्राह्ममुहूर्तीची ही मधुरम स्वप्ने गोकुळी राधामीरा कृष्णसखा मंतरलेल्या साऱ्या कातरवेळी […]

हिशेब जीवनाचा

जगी काय मिळविले काय हरविले अंती एकच प्रश्न अनुत्तरीत असतो हव्यासापोटी किती, काय हरविले सत्यभास हा जीवा अविरत छळतो सारीपाट ! उलगडता जन्मभराचा अंती सारा सत्याचा हिशोब स्मरतो झाले गेले, सारे जरी विसरुनी जावे तरी गतकाळ नित्य आठवीत असतो अंती पश्चातापाचे दग्ध दुःख अंतरी जीव ! क्षणक्षण निश:ब्दीच जगतो जगण्याविना, न दूजा मार्गच कुठला प्रारब्धभोग जन्मभरी […]

1 33 34 35 36 37 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..