मन:शांती
ज्येष्ठत्वे आता फक्त तडजोड करावी आपुल्याच मनाची समजूत घालावी चूक की बरोबर, व्यर्थची वादविवाद अंतरी संघर्षाविना मन:शांती लाभावी आता जगती जन्मताच सारेच सर्वज्ञ इथे कलियुगाचे निर्बंधी दृष्टांत वाजवी भौतिक सुखाचा सभोवार मुक्त संचार आपण स्वतःलाच अंती मुरड घालावी या युगी संस्कारांची, नित्य पायमल्ली हीच जीवनाचीच, जगरहाटी वास्तवी उमजुनी सारे,जगाशी तडजोड करावी सोडुनीया हटवादा, मन:शांती भोगावी या […]