आपुलकी एक शाश्वत सुख
आपुलकी म्हणजे आत्मीयता , ओढ ,जवळीकता , प्रेम , आस्था की जी सर्व नात्यामध्ये असते. आणि या आपुलकीचे महत्व हे श्वासा इतकेच लाघवी आणि शाश्वत असून महत्वाचे असते. […]
आपुलकी म्हणजे आत्मीयता , ओढ ,जवळीकता , प्रेम , आस्था की जी सर्व नात्यामध्ये असते. आणि या आपुलकीचे महत्व हे श्वासा इतकेच लाघवी आणि शाश्वत असून महत्वाचे असते. […]
************ मन मुक्त विरक्त आता अभिलाषा उरली नाही संवेदनाशून्य काळीज चिंता कशाचीच नाही…. कोलाहल उगा अंतरी तो कधीच संपत नाही स्पंदनांची चाहूल संथ सामर्थ्य चैतन्यी नाही…. उदय अस्त कालचक्री त्याला कधी अंत नाही सहज सुखा पांघरताना केवळ स्वार्थी होवू नाही…. हरिहर जाणतो सर्वकाही तिथे कुणास सुटका नाही हे सत्यब्रह्मांडी सुर्यप्रकाशी याचा विसर मना पडू नाही…. ********************** […]
फुलांसारखे फुलत जगावे ब्रह्मांडाला गंधाळीत रहावे सृजनाचा अविष्कार आगळा विश्वात्म्याला सदैव स्मरावे… विलोभनिय ही अदा सृष्टीची त्या सौंदर्यात भुलुनी जावे साक्षात्कार सारा चैतन्याचा सुखामृताला प्राशित रहावे… निसर्गाचेच तत्व निरागस ते हॄदयांतरी जपत रहावे जीवा जगवितो तो कृपाळू निरंतर त्याला भजत रहावे… फुलांसारखे फुलता फुलता निर्माल्यातही सुख मानावे समर्पणात सौख्य आल्हादी याचे भान नित्यची असावे… ******** — […]
विसावता क्षितिजी तेजोगोल अस्ताचलावर केशररंगी अंबर मनभावनांची उलघाल अंतरी सावळबाधी सांजाळ वेदिवर…. मंदमंद धुसर ती कातरवेळा जीवनसंध्येचा हा भास सुंदर घोंगावते आठवांचे मोहोळ उभा सामोरी तो मुरलीधर… अंतर्यामी आज घुमते पावरी लोचनी तरळतो श्यामलसुंदर आज आठविती मित्र सगेसोयरे उचंबळतो भावनांचा गहिवर… ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. ३२८ ११/१२/२०२२
जन्मोजन्मीचा हा जन्म मानवी हसत सरावा उधळीत सुखाला मनी नसावा भाव दुजेपणाचा क्षणोक्षणी जपावे मनामनाला साधेसुधे निर्मळ जीवन असावे शांतवीणारे तनमनांतराला भौतिक सुखदा ही क्षणभराची असो शाश्वताचा ध्यास जीवाला आत्ममुख आपण होत रहावे उगा दोष देवू नये कुणाला जीवाजीवा प्रेम देत जगावे जगी जपत रहावे मानवतेला ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. ३२७ १०/१२/२०२२
हळूच पाऊली येते संध्या जाते बिलगत यामिनिला विलोभनिय ते प्रहर सारे चाहुल निरवतेची सांजेला…. हवीहवीशी मनास शांती मिठित घेते काळोखाला अनाहत अबोली एकरूपता कुरवाळीते जीवाजीवाला… भावगंधल्या त्या प्रीतभावनां सजवुनी जाती मनामनाला आत्मानंदी साक्षात्कार सुंदर अंतरी उधाण येते आनंदाला…. ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. ३२६ ९/१२/२०२२
बरेच काही माझे पण मालकी कुठेच नाही जीव जरी माझा तरी त्यावर सत्ता माझी नाही सारे आपुले म्हणुनी नाती हॄदयी जपत राहिलो मृगजळ होते सारे आपुले कुणीच भासत नाही प्रारब्ध भाळीचे अगदी सहजी भोगुनी झाले आता भोगण्यासारखे तर काहीच उरले नाही जगताना रोज रोज पाहतो हसरे बेगडी चेहरे पण निर्मळ प्रसन्न खरा चेहरा कुठेच दिसत नाही […]
जे होणार ते ते विधिलिखित आहे म्हणुनी कां काही करायचेच नाही देईल हरि मला माझ्या खटल्यावरी हा साक्षात्कार अजुनी झाला नाही श्वास हे जीवनी कायमचे विरणारे हरविलेला क्षण कधी परत येत नाही संदिग्ध वाटेवरी चालावेच लागते रेखा भाळीची बदलता येत नाही जीवन सुखदुःख वेदनांचेच सरोवर सामर्थ्याने तरण्याविना पर्याय नाही मन, भावनांच्या लाटांशी खेळणारे प्रारब्धाच्या गतीविना झुलत […]
आजकाला थोडेच व्यक्त होण्यात मजा आहे इथे उगा व्यर्थ वाचाळपंचविशिचे वावडे आहे सर्वार्थीच हितावह मंत्र , मौनं सर्वार्थ साधनम आज इथे कुणाचेच कुणाला काय पडले आहे संसारी रोज रोज नवनवीन समस्यांचे कोड़े चिंतित जीवाला नित्य सामोरी जायचे आहे विज्ञानयुगी कालचेही आज कालबाह्य ठरते जगणे आज सर्वार्थांने सर्वापुढे आव्हान आहे केवळ पैशानेच कां ? सुखाचे रांजण भरती […]
लोचनातुनी ओघळता मौन तुझे प्रीत अर्थवाही अश्रुतुनी पाझरते तूं ही अशीच अबोली सुंदर मुग्धा तुला शोधण्या ही नजर भिरभीरते ग्रहगोलांच्या अवकाशी भास तुझे संध्याछायेत तुझेच रूप ओसंडते मनगवाक्षी कवडसेच तव प्रीतीचे अंतरंग माझे भावस्पर्शी दरवळते जन्मोजन्मीचे नाते ऋणानुबंधी मनांतराला अलवार कुरवाळीते अशीच सुंदर मौनी प्रीत लाघवी या श्वासाला शांत जगवित रहाते ********* –वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) रचना क्र. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions