जीवन सांगता
झाकोळलेले आभाळ, गतस्मृतींचेच कृष्णमेघ […]
झाकोळलेले आभाळ, गतस्मृतींचेच कृष्णमेघ […]
काव्य ! कल्पनांचेच मोहोळ, अतरंगी रंगढंगलेले आभाळ. शब्द , मनभावनांची सरिता, काव्य ! कल्पनांचेच मोहोळ […]
साहित्यिक , विचारवंतांच्या सहवासातूनच योगायोगाने आमच्या महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेची शाखा मुंबई प्रदेश व ठाणे जिल्हा (महाराष्ट्र्) येथे माझे मित्र कविवर्य प्रा. जयंतराव भावे यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झाली. साहित्य हे वैश्विक आहे. साऱ्या जगभरात मराठी भाषिक आहेत. सध्याच्या या फेसबुक / वाट्सअपच्या जमान्यात या वरील मित्रांचा सहज संपर्क संवाद होत आहे. अनेक मराठी लेखक/कवी आपल्याशी जोडले गेले आहेत. […]
उत्तम मैत्र हे भाग्याने लाभते ! खरी श्रीमंती तीच असते ! त्या बाबतीत मी भाग्यवंतच. मागील एका भागात मी ज्येष्ठ साहित्यिक गुरुवर्य प्राचार्य डॉ. द. ता.भोसले या अत्यन्त विद्यार्थीप्रिय अशा आमच्या कॉलेजच्या मराठीच्या प्राध्यापकांचा उल्लेख केला आहे. ते सध्या पंढरपूरला स्थायिक आहेत. […]
सातारला प्राचीन तसेच ऐतिहासिक शिवकालीन पार्श्वभूमी आहे हे सर्वश्रुत आहे. राष्ट्रसंत प.पू. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, ब्रह्मेन्द्र स्वामी, गोपाळनाथ महाराज त्रिपुटी, गोंदवलेकर महाराज अशा अनेक संतविभूतींची साहित्य ग्रंथ संपदा लाभली आहे आणि तोच अध्यात्मिक साहित्य, कला, संस्कृतीचा देखील प्राचीन वारसा लाभला आहे हे मागील ३३ व्या भागातून प्रत्ययास येते. […]
मी मूळचा सातारकर असल्यामुळे साहित्य, कला, संस्कृतीचे बीजांकुर माझ्यात या सातारच्या पंचक्रोशीतच घडले. थोडेसे कळायला लागल्यापासूनच आमच्या घरात जी मोठी विचारवंत माणसं येत असत रहात असत त्यामुळे आणि तसेच समोरच प्रख्यात वकील कै. मनोहरपंत (काका) भागवत वकील रहात होते. त्यांच्याकडे, राजकीय, सामाजिक, साहित्य, अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने येत असत. आमच्या कुटुंबाचे व त्यांचे अगदी घरचेच संबंध होते. […]
रंगला अभंगी, संतसखा पांडुरंग वाळवंटी वैकुंठीचा राणा पांडुरंग ।।धृ।। आले ज्ञानोबा, आले हो तुकोबा घेऊनी दिंडीसंगे सकल संतजना नाचतो आसमंती , विठ्ठल पांडुरंग ।।१।। बोलती टाळ मृदंग अन दिंड्यापताका वैष्णवांच्या पाऊली, नाचे विठू सावळा मुक्तीच्या सागरी, ब्रह्मरूप पांडुरंग ।।२।। उरले न आता इथे कुठे, द्वैत, अद्वैत एका जनार्दनी, जाहले सारे एकरूप श्वास नि:श्वासाचा धनी, एक पांडुरंग […]
खरं तर नगरमध्ये बरेच कार्यक्रम झाले त्याचे श्रेय माझे परमस्नेही विद्यमान श्री. सर्वोत्तम क्षीरसागर की जे पुण्यातील आमच्या सप्तर्षी मित्र मंडळ व महाकवी कालिदास प्रतिष्ठान या संस्थानच्या अगदी स्थापनेपासून माझ्या सोबतच होते. […]
सुखावला हा जीव की मग जाणवते कधी तरी तुला, आठवण माझी येते असह्य विरहास मी नित्य सरावलेला तरीही आठवांचे आभाळ भरुनी येते अशक्य असते, सारे काही विसरणे हृद्य अंतरीचे रुतलेले, उचंबळूनी येते आज संवेदना जाहल्या साऱ्या मुक्या तरीही अव्यक्त सहज नेत्री दाटूनी येते कातरवेळा! ही सांजाळलेली भाबडी गतस्मृतींनाच, आसमंती उधळीत येते हाच खेळ, अनामिक अतर्क्य जीवनी […]
मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions