नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १४)

ही सगळीच माणसे सर्वार्थांनच धार्मिक ! साहित्यिक ! राजकीय ! सामाजिक ! न्यायिक ! शैक्षणिक ! उद्योजक ! बैंकिंग !
अशा क्षेत्रातील मोठ्ठी ! विद्वान ! उच्च पदस्थ असून किती निर्मोही होती !… किती सन्यस्त वृत्तिची होती !…. किती लाघवी आणी अत्यंत साधी रहाणीमान असणारी होती !… किती परोपकारी होती…याची आज प्रकर्षाने जाणीव होते ..अशा आदर्श व्यक्ती आज खुपच दुर्मिळ झाल्या आहेत. हे मात्र खरे . यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला..हे माझे पूर्वकर्म …एवढेच मी म्हणेन ! […]

सत्य असत्य संभ्रमात

जन्म हा सुखाचा की दुःखाचा.. कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे.. जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे कुणाची कुणाला आज ओढ आहे.. बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध खरे कोण कुणासाठी जगतो आहे.. ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी सांगा , आज मनःशांती कुठे आहे.. ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे.. बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १३)

कुणी मला म्हणाले तुम्ही अष्टपैलु आहात ! कुणी म्हणाले तुम्ही अष्टावधानी आहात ! कुणी म्हणाले तुम्ही हरफ़न मौला आहात ! तर कुणी म्हणाले तुम्ही म्हणजे एक कलंदर व्यक्तिमत्व आहात ! ….पण अगदी खरं सांगायचं झालं तर आजही मी सर्वसामान्यच आहे … *इदं न मम*…आहे तितुके देवाचे ..! एवढेच मी म्हणेन ! हे सर्व सहवासाचे फलितदान आहे !…. […]

अशी कविता येते

कृष्णासम ही नटखट अवखळ.. लाघवी कवीता हळूच पाऊली येते.. मयुरपिसी मखमली मृदुल करांनी.. अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।।१।। कदंब तरुच्या साऊलीत या साक्षात बीज प्रतिभेचे फूलते… शब्दफुलांच्या , वटवृक्षावर भावगंधले गीत कोकिळा गाते…।।२।। कालिंदीच्या ! डोहातूनी त्या लय , ताल सप्तसुरांची येते… राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते…।।३।। शब्दशब्द मनी भाव […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १२)

यातूनच साहित्य , कला संस्कृती यांची जवळीकता , अभिरूची जन्माला आली .. त्यात आणखी जी भर पडली ती माझ्या मुद्रणाच्याव्यवसायामुळे कारण प्रत्यक्षात अनेक साहित्यिक भेटण्याची त्यांच्या सह्या घेण्याची संधी मिळाली .. तेंव्हा पासुनच ही साहित्याभिरूचीची मशागत ही माझ्या पौगण्डावस्थेपासुुनच सुरु झाली हे स्व. कवयित्री शांताबाईं शेळके यांचे वाक्य आज सार्थ वाटते .!… जीवनाला सर्वार्थानं पोषक असा मार्गदर्शक सहवास योगायोगाने लाभला …हेच परमभाग्य ! घरातील वातावरण देखील याला कारणीभूत होते ..!!!! […]

अनाकलनीय हुरहूर

कधी खेळकर तर कधी चिंतातुर.. कधी आनंदी तर कधी उदासीन.. अनाकलनीय हुरहूर ही विलक्षण.. तरीही , उमलते हळुहळु जीवन..।।१।। कालचक्र सृष्टीचे , अखंड अविरत.. तांडव , पंचमहाभूतांचे ऋतूऋतून.. स्पंदनांतुनी , सुखदुःखांचे ओघळ.. ऋणानुबंधी ! सारे संचिती जीवन..।।२।। प्रीतभावनां ! अंकुर मानवतेचा.. प्रीतीविना कां दुजे असते जीवन.. ब्रह्मानंदी ! केवळ स्पर्श प्रीतीचा.. कृपावंती मोक्षदा , कृतार्थ जीवन..।।३।। […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ११)

जीवनामध्ये अनेक व्यक्ती येत असतात. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असते. या लेख मालिकेत मी फक्त मला लाभलेला साहित्यिक सहवास या बद्दलच्या आठवणी लिहीत आहे. माझ्या अगदी वयाच्या 10 व्या वर्षांपासून ते आजपर्यंत म्हणजे सुमारे 60 वर्षांच्या आठवणी मनात घर करून आहेत. अगदी बालपणी प्रवचनकार , कीर्तनकार , अनेक सांस्कृतिक , धार्मिक कार्यक्रमातून ऐकलेले , प्रत्यक्षात भेटलेले सर्वच दिगग्ज , मान्यवर आठवतात.. किती आणि कुणाकुणाची नावे लिहावीत याच संभ्रमात मी आहे. पण या सर्वच विविध क्षेत्रातील मंडळींचा सहवास जीवनात काहीतरी शिकवून गेला , जगण्याची उमेद देवून गेला हे मात्र खरे. […]

चाललो पंढरीला पायी

चाललो पंढरीला पायी पाहतो विठ्ठलरखुमाई ।।धृ।। वेचूनी संतांच्या सद्गुणी गुंफितो मी भावफुलांची वेंणी ।।१।। रांगलो , खेळलो , धावलो या तुझ्या विश्वाच्या अंगणी ।।२।। नुमजे मजला गाथा ज्ञानेश्वरी मी अज्ञानी ऐकतो संतांची वैखरी ।।३।। लावूनी टिळा गंध कपाळी दंगलो दिंडी, किर्तनी टाळ मृदंगी ।।४।। गायली मी , जीवनाची भैरवी आता लागली ब्रह्मानंदी टाळी ।।५।। लोचनी विठाई […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १०)

मी माझ्या मुद्रण / प्रकाशन व्यवसायात दरवर्षी सुमारे 5 दिवाळी अंक छापत असे. त्यातील ज्ञानदूत हा अंक मुंबईतून निघत असे. प्रसिद्ध नोगी कंपनी (माकडछाप काळी टूथ पावडर) यांच्या तर्फे मालक कै. प.सी.बोले व कै. तारा बोले हा दिवाळी अंक प्रकाशित करत असत. त्यांचे आणि माझे खुपच जवळचे संबंध होते. त्यांच्यामुळे मुंबईतही माझ्या खुप ओळखी झाल्या. […]

सागरमाया

नितळ लोचनी नीरव शांत चराचर.. ब्रह्ममुहूर्ती ऐकू येते सागराची गाज.. एकांती उसळते आर्त भावनांचे गुज.. बिलगता पवन , रुणझुण ती प्रीतीची..।। १ ।। माहोल , सारा सर्वांतरा दीपविणारा.. प्राचीवरी अलवार उमले बिंब केशरी.. प्रतिबिंब लालगे ते लाघवी मनोहर.. ऐकू येते सुरावट मंगलमयी प्रीतीची..।। २।। महाकाय , अथांग महासागर हृदयी.. भावनांच्याच बेभान लाटा गगनभेदी.. निरवतेत , घोंगावती […]

1 42 43 44 45 46
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..