निष्काम निर्लेपी
कोण छोटा कोण मोठा सहॄदयी तो आत्मा मोठा जिथे सुखावे तन्मनअंतर तो निष्काम निर्लेपी मोठा ब्रह्मांडालाही कवेत घेतो तो निर्गुण निरागस मोठा प्रसन्न कृपाळू रूप ज्याचे तो अगम्य परमात्मा मोठा जो भेटता सुख मोक्षानंदी तो अनामिक ईश्वर मोठा कर्मकांडी सत्कर्मी जगावे तोच एक संचिताचा साठा हरिनामी नित्य रमुनी जावे मोक्षमुक्तिचा तो मार्ग मोठा — वि.ग.सातपुते (भावकवी) […]