आधुनिक काशियात्रा
रोजची पहाट चे संपादक आणि स्वतःस मुलाखत सम्राट म्हणवून घेणारे सूर्याजीराव रविसांडे आज फारच अस्वस्थ दिसत होते. दुपारचा रवि आकाशात तळपत होता आणि इकडे सूर्याजीरावांचा तिळपापड होत होता. ते मोठ्या आतुरतेने त्यांचे मुख्य वार्ताहर आणि मुलाखत तज्ञ, काका सरधोपट यांची वाट पहात होते. […]