ज्येष्ठत्व नको पण कायदा आवर!
“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.” रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते. “होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान […]