पत्र महिमा
पत्र लिहावे मित्रा पत्र लिहावे आप्ता मित्र आणि आप्त थोर नशीबाने प्राप्त पत्र आनंद लिहिण्याचा पत्र आनंद वाचण्याचा पत्र आनंद खरडण्याचा पत्र आनंद जाणावा घरोघरी येता दिवाळी दसरा पत्र आनंद पसरा पत्र आनंदाची रांगोळी पत्र खुसखुशीत कडबोळी – जाण बाबा पत्र महिमा पुरातन संस्कृतीचे साधन मानवाचे भूषण संस्कृतीचे लक्षण – जाणिजे — विनायक अत्रे.