नवीन लेखन...
विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

प्रतिकृती – भाग १ (कथा)

नुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते. […]

शिक्षण कोहिनूर (कथा)

“साहेब ते कोहिनूर वेगळे आणि हे शिक्षण कोहिनूर वेगळे. या वर्षापासून सरकारने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षकास हा सन्मान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अण्णागुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मूलभूत प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे.’ […]

मालिका मल्लिका (कथा)

दैनिक ‘रोजची पहाट’चे संपादक सूर्याजीराव रविसांडे अत्यंत अस्वस्थ होते. त्यांचे प्रमुख वार्ताहर काका सरधोपट दिवाळीची सुट्टी घेऊन जे गायब झाले होते ते अजूनही उगवलेले नव्हते. रोजची पहाट होत होती, पण काका नसल्यामुळे दूरदर्शन मालिकांवर विशेषांक काढायचे काम रखडलेल होते. प्रसिद्ध ‘दूरदर्शन मालिका’ लेखिका ज्यांना ‘मालिका मल्लिका’ म्हणत त्या कादंबरीबाई गुंडाळे यांची मुलाखत घ्यायचे काम काकांना दिले होते. पण ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ तसे हे भरवशाचे काका, सूर्याजीरावांच्या काळजाचा ठोका चुकवित होते. त्यामुळेच ते बेचैन होते, तेवढ्यात काका आले. […]

ज्येष्ठ-श्रेष्ठ (कथा)

सूर्याजीराव रविसांडे, रोजची पहाटचे संपादक आणि काका सरधोपट, रोजची पहाटचे मुख्य वार्ताहर. रोजची पहाटच्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या विशेषांकाच्या तयारीच्या कामात गुंतले होते. […]

नागबळी – Part 4

रोज रात्री अभ्यासिकेच्या फुटपाथकडील पायरीवर बसून मी तासनतास विचार करू लागलो. घरी जायला उशीर होऊ लागला तशी मित्राकडे अभ्यासाला जातो म्हणून वेळ मारून नेली. पायरीवर बसल्या बसल्या समोरच्या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पहात बसायचो. डोक्यांत मात्र सुडाचेच विचार असत. गावात येणारे सामानाचे ट्रक हायवेवरून या समोरच्याच रस्त्यावरून जात येत. रात्री बारानंतर त्यांची रहदारी वाढत असे. असाच […]

नागबळी – Part 3

आम्ही विसरलो, पण नागेश विसरला नव्हता. याचे प्रत्यंतर आम्हाला लवकरच आले. आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका होत्या मित्र मंडळाच्या कार्यक्रमाच्या दगदगीतून आम्ही नुकतेच बाहेर पडलो होतो त्यामुळे यावर्षी निवडणुकीत भाग घ्यायचा नाही असे आम्ही ठरवले होते. निवडणुकांच्या धामधुमीत क्लासेस फारसे होत नव्हते. एक दिवस एक तास ऑफ मिळाला. म्हणून सुनीता एकटीच कॅन्टीनमध्ये एका कोपऱ्यात टेबलावर बसली […]

नागबळी – Part 2

तालमी सुरु झाल्या पण म्हणावी अशी गती येत नव्हती. जसजसा गणेशोत्सव जवळ येऊ लागला. तसतसे वातावरण तापू लागले. शेवटी परीक्षा जवळ आल्या म्हणजे जसं आखलेलं वेळापत्रक बाजूला पडतं आणि दिवस रात्र अभ्यास चालू होतो तसंच झालं. आजपर्यंत हा नाही आला, तो नाही आला अशी टंगळमंगळ चालू होती. ती जाणवू लागली. ज्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होते त्यांचा फारसा […]

नागबळी – Part 1

सुनीता माझी धाकटी बहीण. माझ्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान. लहानपणापासून दादा दादा म्हणून सारखी माझ्यामागे असते. आता ती दहावीला आणि मी बारावीला आलो तरी तिला माझ्याशिवाय करमत नाही. भांडेल, रुसेल पण शेवटी सुनीलदादा म्हणून लाडीगोडी करायला येणारच. माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. दर दोन तीन वर्षांनी बदल्या ठरलेल्या. मग नवीन गाव, नवीन शाळा, नवीन मित्र अशी मजा […]

भंगारातली बांगडी – Part 2

शामराव तपास आटोपून परत आले. त्यांच्या मनात मात्र हा भोळसट दिसणारा दिनकरच या प्रकरणाच्या मागे असावा असे राहून राहून वाटत होते. बांगड्यांचे तुकडे सापडल्यापासून त्यांच्या मनात एक कल्पना घोळू लागली होती. या पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी मिसिंग केस संदर्भात या भागातील आणि त्याच्या आसपासच्या भागातील सर्व मिसिंग, मर्डर, अॅक्सिडेंट केसचा धांडोळा घेतला होता पण दिनकर आणि ऐश्वर्या कोकणातल्या […]

भंगारातली बांगडी – Part 1

इन्स्पेक्टर शामराव साळुंकेनी वागळे इस्टेट पोलीस ठाणे, ठाणे याचा नुकताच चार्ज घेतला होता. पोलीस ठाण्याची, गुन्ह्यांची वगैरे जुजबी माहिती त्यांना मिळाली होतीच परंतु तेवढ्याने साळुकेचं समाधान झालं नव्हतं. सर्वसामान्यपणे ठोकपीट मेथडचा अवलंब करून गुन्ह्याची उकल करण्याकडे त्यांचा कल नव्हता. गुन्ह्याचे सूक्ष्म विश्लेषण करुन, बारीक सारीक धागे जुळवून बुध्दी कौशल्याने त्याची उकल करण्यात त्यांना रस होता. फारच […]

1 4 5 6 7 8 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..