मराठी गझल – तुझ्या-विना
तुझ्या विना सखे अता रिते रिते जगायचे तुझ्याच आठवात मी कसे किती झुरायचे मला नकोच वाटते जिणे असे उदास पण तुझा सुगंध भासतो म्हणून श्वास घ्यायचे दुखावल्या मनावरी हळूच फुंकरीन मी सुखावतील वेदना असे मला लिहायचे नभात माळल्यास तू असंख्य तारका जरी तयांस दाखवायला मलाच रात्र व्हायचे तुलाच शोधतात ही अधीर तीव्र स्पंदने तुला लिहीत गात […]