निरिच्छ होऊन जगण्यात सर्वोच्च आनंद
आयुष्यभर राजयोगी होऊन रहाणे फार अवघड गोष्ट आहे. आयुष्यात व्यवहारही आवश्यकच आहे.पण त्या व्यवहारांच्या किंमती पलिकडे जाऊन जगाला आपले देणे देता येणे हे महद्भाग्य फार थोड्याश्याच भाग्यवान व्यक्तींना लाभते. […]
आयुष्यभर राजयोगी होऊन रहाणे फार अवघड गोष्ट आहे. आयुष्यात व्यवहारही आवश्यकच आहे.पण त्या व्यवहारांच्या किंमती पलिकडे जाऊन जगाला आपले देणे देता येणे हे महद्भाग्य फार थोड्याश्याच भाग्यवान व्यक्तींना लाभते. […]
प्रियेचा किती छान पत्ता सांगितला आहे त्या रसिक प्रियकराने, वा वा! सुंदर! तुला रस्त्यात पारिजातकाचा सडा पडलेला दिसला की तिथून डावीकडे वळ, पुढे नदीच्या किनाऱ्यावर केवड्याचा सुवास येईल, तिथे वेढा घालून बसलेल्या नागिणीला विचार, ती तुला माझ्या घराचा पत्ता सांगेल. किंवा वसंतात घरी येणाऱ्या प्रियकराला तू पहाटे पहाटेच तिथे पोहोच, सकाळी मोगरा तुला माझ्या घरी ओढून घेऊन येईल. […]
आपण आपल्या अंतिम ध्येयावर प्रेम न करता साधनांवरच प्रेम करीत बसतो आणि आपले आयुष्य उजाड करतो. आपले अंतिम ध्येय, अंतिम उद्दिष्ट्य निश्चित करणे आणि त्यासाठी झटत राहणे हे प्रत्येकाचे इतिकर्तव्य आहे. साधनांवर वृथा प्रेम करून, साधनांची वृथा भक्ती करून, साधनांचे वृथा अभिमान बाळगून आपण आपल्या आयुष्यात हिंसेला जन्म दिला आहे. साधनांचा योग्य आदर राखून निगराणी करून साध्यावर लक्ष केंद्रित करणे हि खरी अहिंसा आहे. […]
आयुष्यात आनंद मिळवायचा हा मूळ उद्देश सोडून देऊन तो आनंद कसा मिळवायचा यावरून जगामध्ये भांडणं आणि कट्टरता सुरू आहे. आपल्या धर्माकडे तटस्थ वृत्तीने बघून जे त्याज्य आहे ते टाकून देऊन जे उपयुक्त आहे जे आधुनिक सुधारीत जगामध्ये उपयुक्त आहे तेच स्वीकारायचे, हा विवेकानंदांचा धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुस्लिम समाजानेही आत्मसात करावा, या मताचा मी आहे. […]
ज्ञानेश्वरीतील पहिल्या काही ओव्या वाचल्या कि माऊलींच्या प्रतिभेची ताकत लक्षात येते. आणि आपण किती नकळतपणे आपला देव अक्षर रुपात पाहू लागतो, याची आपल्याला कल्पनाही येत नाही. […]
हुकूमशाहीला किंवा एकाधिकारशाहीला समाजवाद समजलं गेल्यामुळे भारतात लोकशाही हा मोठ्ठा विनोद झाला.
माणसाच्या डे टु डे गोष्टींमध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप होऊ लागल्यामुळे, राजकारणी आणि प्रशासन हा लोकांच्या टीकेचा विषय झाला. निवडून येणे हा सर्वोच्च असण्याचा निकष झाला, शिक्षण अनुभव ज्ञान हे दुय्यम झाले. सत्ता एकवटली गेली, अभिव्यक्ती हरवली गेली. […]
इसवीसनाच्या पूर्वी तीन हजार मध्ये लिहिलेल्या ऋग्वेदामध्ये सारी या वस्त्राचा उल्लेख सर्वप्रथम आढळतो. याचा अर्थ सारी ही त्याही पूर्वी अनेक वर्षे वापरली जात असावी. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions