चाळिशीसाठी सज्ज मी
आजच्या धावपळीच्या व दमवणाऱ्या जगण्यात अचानक चाळिशी येते व आपल्याला आपल्यातले हे असे बदल अचंबित करतात. पण लक्षात घ्या की हे सगळे बदल रातोरात होत नाहीत. पळापळीच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असतील तरीही त्यांची दखल घ्यायची जरूरी आपल्याला भासत नाही आणि मग कधीतरी अचानक चालत्या गाडीला ब्रेक बसावा तसे काहीतरी निमित्त होते व जाणवते की खरंच, असं सगळं झालेलं दिसतंय ! पण या सदराद्वारे मी आपल्याला थोड्याफार प्रमाणात या चाळिशीसाठी तयार कसे रहायचे हे सांगायचा प्रयत्न करणार आहे. […]