खरे मित्र-खरं जीवन!
आपल्या तोडीचंच किंवा थोडा वरचढ सेन्स ऑफ ह्यूमर असणारं फ्रेंड सर्कल असणं ह्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आपण मारलेला एखादा पंच समोरच्याला समजावून सांगायची वेळ येणे ह्यासारखं दुर्भाग्य नाही. समोरासमोर नसतानासुद्धा गप्पा मारताना टाईप केलेल्या वाक्यांमधून हवा तो अर्थ पटकन पटकन समजून, त्याचा अजून तिरका अर्थ काढून बोललेलं वाक्य तिसरीकडे नेऊन ठेवणे ह्यातली मजा अवर्णनीय आहे. […]