आमचे लहानपणीची दिवाळी
लहानपणी सुगीची काम सुरु असताना थंडीची चाहूल लागली की घरापुढच्या अंगणात शेकोट्या पेटायच्या. माणसं अंगावर शाल चादरी पांघरून हात पुढं करुन जाळावर ऊब घेत शेकायची. बच्चे मंडळीवर शेकोटी जळत राहण्यासाठी लागणारा पाला, पाचट आणायची जाबादारी असायची. मग शेकताना शेकोटीवर साऱ्या गावाच्या चर्चा चालायच्या. कुणाला एवढं जुंधळं झालं. तमक्याच्या भुईमुगाला किती शेंगाचं घस लागलं इथपासुन ते अमक्याची […]