भारतीय शिल्पशास्त्राची सहा मुलतत्वे
ज्या भौतिक वस्तुच्या निर्मितीशास्त्राला इंग्रजीत “ इंजिनिअरिंग” म्हणतात त्याला शिल्पशास्त्र असे व्यापक अर्थ असलेले भारतीय नांव आहे. शिल्पशास्त्र मनुष्य जन्मापासून विकसित होत गेले. आधुनिक अभियांत्रिकी शास्त्रांत अंतर्भाव असलेली अनेक शास्त्रे प्राचीन भारतांत विद्यमान होती. भृगु ऋषींनी या शिल्पशास्त्र विषयाचे दहा उपशास्त्रे, बत्तीस विद्या व चौसष्ठ कला या मध्ये विभागणी केली. वास्तुशास्त्र हे सातवे उपशास्त्र. […]