नवीन लेखन...
Avatar
About विठ्ठल जाधव
श्री विट्ठल जाधव हे अनेक मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. ते बीड जिल्ह्यातील शिरुरकासार येथील रहिवासी असून पुण्यनगरी आणि इतर वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन करत असतात. त्यांना साहित्यविषयक अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

हुशार राजू

राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती. त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी […]

भाकर आणि वावर

मुलगा म्हणाला बापाला ‘पप्पा,गुगलवर हवं ते मिळते, जसं म्हणावं तस ते ऐकते’ मग तो म्हणाला, ‘ हे गुगल, सिंग अ साँग फाॅर मी’ गुगलने लगेच गाणे म्हटले. ‘ओके ,व्हाट्स अबाऊट टुडे.’ आजचा दिनविशेष सांगितला ‘हे गुगल , शो टुडेज वेदर ‘ लगेच गुगलने आजचे तापमान सांगितले. बाप म्हणाला, ‘वाss बेटा, वाss!’ बरं बेटा आता गुगलला हे […]

आईचा वाढदिवस

मी खुदकन हसलो तू गालात हसतेस मी रडरड रडलो तू छातीशी धरतेस मी शाळेत असताना वाट सारखी पाहतेस डबा तसाच दिसला तू लालेलाल होतेस असे माझा वाढदिवस तू दिनरात राबतेस आयाबाया बोलावून ओवाळणी करतेस कधीतरी साजरा कर आई तुझा वाढदिवस आम्हीही भरवू तोंडी पेढ्यांचा जो गोडघास आई , बन तू लेकरू आम्ही तुझी माय होवू तुला […]

झेंडू

उन्हातही फुलावेस असा तुझा रूबाब आहे निसर्गाचे वरदान पिवळाझेंडू लाजवाब आहे कशास शोधू तो स्वर्ग कुठला कुणास ठाऊक ? बळीराजा इथेच घडवितो दार स्वर्गाचे मनभाऊक.. विठ्ठल जाधव शिरूरकासार (बीड) सं. ९४२१४४२९९५

शेतीमातीची सल ‘ करपलं रान सारं’

शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे ‘करपलं रान सारं’ या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड […]

मातृभाषा

जगामंदी व्हावी थोर मनी अशी एक आशा मातीच्या गंधाने शोभे मराठी जी मातृभाषा डंका तिचा वाजतील मराठमोळी लेकरं बोल तिचे घुमतील साताही समुद्रापार सदैव तिच्या रक्षणा तत्पर आपण राहू तिच्या या सामर्थ्याने नभदिशा धुंद पाहू अभिजात सहवास लाभे अनादिकाळाने चंद्र, सूर्य, तारे नभी येतील पुन्हा नव्याने जोडतो मनांत तारा सह्यगिरीवरी वारा तिचे गुणगाण गाऊ तिची आरतीही […]

चौदाखडी

‘अ ‘ ने खाल्ले अननस ‘आ ‘ पळाला आईकडे ‘ इ ‘ ने घातली इजार ‘ ई ‘ ने पाहिले ईडलिंबू ‘ उ ‘ ना माहिती उपमा ‘ ऊ ‘ ने खाल्ला ऊस ‘ ए ‘ तर एकलकोंडा ‘ ऐ ‘ ची वाढते ऐपत ‘ ॲ ‘ तर घेतो ॲक्शन ‘ ओ ‘ ची जुनीच ओळख […]

शेळीचे मानसशास्त्र !

ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव…. […]

शिक्षकांच्या हाती समाजपरिवर्तन

एखाद्या शिक्षकाचा विद्यार्थी अचानक रस्त्यावर भेटतो. ” ओळखलं का सर ? ” असं म्हणतो.” मी आता अमुक एका ठिकाणी असे असे काम करतोय.तुम्ही मला शिकवताना अस म्हणत होता. ” असं म्हणत तो जेव्हा गुरूपुढे नतमस्तक होतो तेव्हा ते गुरू स्वतःला धन्य मानत असतात आणि तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार असतो. […]

शेतकरी पाल्यांचे शिक्षणवास्तव

दरवर्षी शालेय सत्राच्या सुरूवातीस जशी मुलांची, पालकांची शाळासुविधेसाठी धावपळ असते. तशीच रानातदेखील शेतकर्‍यांची धावपळ सुरू होते. नवा वर्ग, नवे मित्र, नवी शाळा, नवे दप्तर , नवे कपडे. सारे काही नवे नवे. या नवेपणाच्या नवलाईत खूप काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. शेतातही तसेच असते. नवा पाऊस, नवी पालवी, खते पिके आणि नवे बियाणे. हा काळ महत्वाचा याचसाठी […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..