डोंगर, कागद आणि लेखन
तो निश्चल आहे. परोपकारी आहे. हिरवा, पिवळा, तपकिरी, काळसर रंगाचा आहे. उंच आहे. सखल आहे. बाजूला निवडूंग, सीताफळाची जाळी. हेकळा-टाकळा बहरलेल्या. शेळ्या, मेंढय़ा, म्हशी, गुरं-ढोरं अंगाखांद्यावर घेऊन करतो पालनपोषण . अनेक वाटा येऊन मिळतात त्याला.. पांदीच्या, कच्च्या, वळणी, पाऊलवाटा . डोक्यावर चिंचेचं झाड डेरेदार. चिंचेखाली एक बाल आहे. पसरट मोठा दगड़. त्यावर बसून गारमस्त हवा घ्यायची. […]