नवीन लेखन...
Avatar
About विवेक पटाईत
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

मेघ बरसला

मेघ बरसला विरही अश्रूंचा खारा खारा. मेघ बरसला प्रथम आषाढी प्रिय वार्तेचा. मेघ बरसला माळात रानात काळा काळा. मेघ बरसला भिजली धरणी हिरवी हिरवी. — विवेक पटाईत

लघु कथा – पिंपळ आणि आत्महत्या करणारा

पुन्हा बारावीत तो नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. मनात विचारांचे काहूर उठले होते. आपण एक साधी परीक्षा हि पास करू शकत नाही. व्यर्थ आहे असे जगणे. आपण मेलो […]

पहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक

काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक. […]

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय

अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्‍यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे…… जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे….. […]

पर्यावरण प्रेमी साहेब

पूर्वी केंद्र सरकारच्या कार्यालयांत फक्त सचिवाला गाडीची सुविधा होती. बाकी वरिष्ठ अधिकार्यांना फक्त जाण्या-येण्यासाठी गाडी. तेही किमान २ अधिकार्यांना एकाच गाडीत आणले जायचे. पण आजकाल सर्वच प्रशासनिक सेवेच्या अधिकार्यांना स्वतंत्र गाडी दिली जाते. महानगरचे प्रदूषण वाढविण्यात साहेबांच्या गाडीचा हि योगदान आहेच. […]

प्रदूषण – एक मुलाकात धुळीच्या आंधी सोबत

मी निरुत्तर झालो, माझ्याच घरात काय, दिल्लीतल्या ८० टक्के घरांत आंगण नाही किंवा कुठले झाड हि नाही. रस्त्यांवरची झाडे हि दुकानदारांनी, आपले दुकान वाढविण्यासाठी केंव्हाच तोडून टाकली. मोठ्या-मोठ्या कोठीवाल्यांना हि त्यांच्या महागड्या कारांवर पडणारा झाडांच्या पानांचा कचरा सहन झाला नाही. त्यांनी हि झाडांना तोडून टाकले. आता धुळीच्या आंधीला विसाव्यासाठी कुठलीच जागा उरली नाही. थेट लोकांच्या घरात शिरणे तिची हि मजबुरी. […]

प्रदूषण (२३) : सूर्यदेवा रागवला का रे?

अजून एप्रिलची नुकतीच सुरुवात झाली आणि सूर्यदेव आग ओकतो आहे. असेच राहिले तर पाण्या अभावी पक्षी तडफडून मारतील. हरीयाणातून येणार्या कालव्याच्या पाण्याची वाटेतच वाफ होईल. दोन्ही राज्यात पाण्यासाठी भांडणे व पाणी कपात सुरु होईल. पाण्याच्या टेंकर समोर रांगा लागतील. पाण्यासाठी माऱ्यामाऱ्या होतील. काहींचा जीव हि जाईल. एप्रिल मध्ये हि परिस्थिती आहे तर मे जून मध्ये काय परिस्थिती निर्माण होईल, कल्पना करवत नाही. असे चालणार नाही, मनात येईल तसे वागणार्या सूर्यदेवाला जाब विचारायलाच पाहिजे. […]

प्रदूषण (२२)- आषाढस्य प्रथम दिवसे

आषाढच्या मेघाने खाली वाकून जमिनीवर बघितले धुळीच्या आवरणा खाली दिसत होत्या गगनचुंबी ईमारती. आकाशात तेजाबी धूर ओकणाऱ्या असंख्य फैक्ट्ररीज व लाखोंच्या संख्येने रस्त्यावर धावणारी वाहने विषाक्त धूर सोडणारी. एक काळी रेखा हि त्याला दिसली, बहुतेक हीच यमुना असावी. मेघाला यक्षाने भरतखंडाच्या राजधानीचे केलेले वर्णन आठवले. मेघाला प्रश्न पडला इथे खालचे काहीच व्यवस्थित दिसत नाही. अश्या परिस्थितीत यक्षप्रियाला शोधणार तरी कसे? आषाढच्या मेघाने जोरदार वर्षाव करून वातावरण स्वच्छ करण्याचा निश्चय केला. […]

प्रदूषण २१: मय दानवाचा बदला

मय दानवाने पर्वतांचे हृदय फोडले, जमीन खोदून काढली नानाविध खनिजे – लोखंड, कोळसा इत्यादी. सिमेंट कांक्रीटची गुगनचुंबी इमारते उभी राहिली. मय दानवाने पाताळातून काढले हलाहल विष. धावती त्या विषावर त्यावर नानाविध वाहने ओकीत विषाक्त धूर. अन्न, पाणी आणि वायूत हि पसरविले दानवाने हलाहल विष. […]

1 2 3 4 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..