Articles by विजय प्रभाकर नगरकर
आशा
ग्राहकाला शिलाईचे कपडे देताना टेलर वारंवार हेच करीत असतो कुठे टाका, कुठे बटण तो शिवतच राहतो, परीक्षक हातातील उत्तरपत्रिका हिसकावून घेई पर्यंत काही खरे,कुठे चुकीचे काही न काही तरी परीक्षार्थी लिहीतच राहतो, शेवटचा श्वास आहे तोपर्यंत चूक-अचूक निशाणा तो सैनिक साधित शेवट पर्यंत लढत राहतो, कोणीही शस्त्र खाली खाली ठेवत नाही कोणीही आशा सोडीत नाही अंतिम […]
अस्तित्व
“अव्यक्त” जे व्यक्त होतात ती मते कदाचित मनात,हृदयात पोहचत नसतील तरी ती कानावर पडली पाहिजेत, वाद विवाद संवाद कोलाहलात सुद्धा शोधले पाहिजेत, जे व्यक्त होत नाहीत त्यांच्या अस्तित्वाचा सुद्धा आदर करुयात, इथे फक्त माझे अस्तित्वच मोलाचे नाही, या यात्रेत सहवास ,सह अस्तित्व सुद्धा मोलाचे आहे, तुझ्या,माझ्या व त्यांच्या जगण्याचे मोल सदैव समजले पाहिजे. ~ विजय नगरकर
मी कैनेरी चिमणी
मी कैनेरी चिमणीचा पुनर्जन्म आहे, जिला उतरवले जाते खोल कोळशाच्या खाणीत ऑक्सीजनचा अंदाज घेण्या साठी. मी आज सुद्धा खोल अंधारात नात्याच्या खाणीत ऑक्सीजनचा शोध घेते….. न जाणे कधी तरी मी होते पळस जो भर उन्हात बहरून येतो जो सर्वांना जीवन रस देण्यासाठी खोल ओल शोधीत जातो, अस्थिर वादळात सुद्धा मी स्थिर आहे शाश्वत आहे माझे स्मित […]
सुप्रसिध्द हिंदी कविता ‘मोची’ चा मराठी अनुवाद
हिंदी साहित्यातील सुप्रसिध्द कवि स्व. धूमिल ( सुधाकर पांडे) यांची सुप्रसिध्द कविता मोची या रचनेचा मराठी अनुवाद वाचकां पुढे सादर करीत आहे. ( मुळ नांव- सुदामा पांडेय, उपनाम धूमिल जन्म स्थानखेवली, जिला वाराणसी, उत्तरप्रदेशकुछ प्रमुख रचना- संसद से सड़क तक (1972), कल सुनना मुझे, सुदामा पाण्डे का प्रजातंत्र (1983)विविध कल सुनना मुझे काव्य संग्रहा करीता 1979 […]
मराठी पाट्या
भाषेच्या राजकारणात नेहमीच भारतीय भाषेचा बळी जातो. इंग्रजीच्या वर्चस्वाबद्धल कोणीच काही ब्र शब्द उच्चारीत नाही कारण सर्वसामान्या पेक्षा राजकारणी,संस्थाचालक,नोकरशहा व शहरी लोक इंग्रजीला शरण गेले आहेत. अशावेळी भारतीय भाषेचा विकास करण्याची जबाबदारी भारतीय भाषा प्रेमी यांची आहे. […]
भक्ति विजय ग्रंथ व बहु भाषिकता
ज्ञान प्राप्ति करीता पर्यटन व भारतीय संस्कृतिचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक भाषा परिवारातील विद्वानांनाचे सान्निध्य आवश्यक असते हे महिपती महाराज यांनी जाणले होते. खरा सच्चा संत हा सर्व भाषेशी मैत्री ठेवतो. वर्तमान काळी सर्वांनी भाषा भेद, जातीभेद वर्ज्य केला तर ज्ञान, भक्ती,विकास होणार हे निश्चित आहे. […]