बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – ५
मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो. […]
मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो. […]
एका शिस्तबध्द जीवनाला सुरुवात झाली होती. जानेवारी-१९८२ मध्ये प्रशिक्षण संपवून मी पुन्हा ठाणे जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून हजर झालो. […]
आयुष्यात काहीतरी करायचं, या उद्देशाने जीवनाचं सार्थक करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत होतो. पण त्याच वेळी गावाकडला आप्तस्वकीयांची, आई- वडिलांची आठवण आली की, एक एक क्षण युगासारखा वाटायचा. […]
सन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली. […]
२०१८ च्या डिसेंबर महिन्यात आमच्या गुड्डीचा (विशाखा) विवाह झाला. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार झाला होता. सन-२०१८ साल लग्नाच्या गडबडीत कधी सरलं हे कळायच्या आत सन-२०१९ साल सुरू झालं. […]
माणसाचं मन असंच असतं. प्रसंगी आकाशात झेपावणाऱ्या गरूडापुढे झेपावते तर कधी जमिनीवरून सरपटणाऱ्या सापासारखे जमिनीवरून सरपटते. सर्कशीतल्या वाघाला एका चाबकाच्या फटकाऱ्या बरोबर नाचायला लावणारे माणसाचे मनं एखादी पाल अंगावर पडली तरी क्षणात थरथरते. […]
स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते. […]
आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो. […]
मी पोलीस खात्यात नोकरी करणारा अधिकारी असल्याने वर्तमान पत्रात येणाऱ्या बातम्या किंवा त्यामध्ये येणाऱ्या घटना माझ्यासाठी नवीन नव्हत्या किंवा त्याचं नाविन्य असं काही नव्हतं. […]
पुरूष प्रधान संस्कृती असली तरीही महिलांना तितकंच प्राधान्य देण्यासाठी सरकार पातळीवरून कायदे होतांना दिसत आहेत. महिलांना समान हक्क मिळण्यासाठी कायदे केले जात आहेत. स्त्री-पुरुष समान न्यायाने वागण्यासाठी समाज झगडत आहे. त्याचबरोबर अनेक संस्था, संस्थांमधील लोकांनी महिलांना प्राधान्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions