गम्मत एका देवळातील
गेल्या ३४ वर्षामध्ये पोलीस खात्यात वेगवेगळ्या जिल्हयांत, विभागांत आणि पोलीस ठाण्यांत काम करीत असतांना अनेक प्रसंग पहायला मिळाले. त्या प्रसंगांतून खूप काही शिकायला मिळालं. ते प्रसंग प्रत्यक्षात समोर घडल्यामुळे अनुभवाच्या शिदोरीचे गाठोडे मोठेच्या मोठे कधी झाले, ते कळलचं नाही. पोलिस खात्यात काम करतांना काही वेळेस जे पोलिसांचे काम नाही किंवा ज्या कामाचा पोलिसांशी काही संबंध नाही, अशा प्रकारचे कामसुध्दा पोलिसांना करावे लागते. […]