कोकणातील अष्टविनायक
कोकणवासीयांचे आराध्य दैवत म्हणून सर्व थरातून फार वर्षांपासून गणेशाची उपासना कोकण प्रांतात होते. आंबा, नारळ, फणस, सुपारीसारख्या प्रसिद्ध फळांप्रमाणेच कोकणातला गणेशोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवाला तरी हटकून आपल्या गावी जाणारच. परशुरामाने स्थापन केलेल्या या कोकणभूमीमध्ये काही प्रसिद्ध गणेशस्थाने आहेत. त्याचा प्रचार आणि प्रसार जरी मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी ती स्थाने अत्यंत सुंदर, देखण्या मूर्ती असलेली व अत्यंत पवित्र स्थाने आहेत. […]