छंद आणि स्त्री
टळटळीत दुपारी जेव्हा माझी बहीण आणि आमच्या इतर मैत्रिणी घराबाहेर गोट्या खेळायच्या तेव्हा केवळ मला ऊन सहन व्हायचे नाही म्हणून मी घरातच काहीतरी करण्याचा उद्योग केला. ‘आई आणि बाळ’ यांची चित्रे काढायला सुरुवात केली. आई आणि बाळ एकत्रितपणे कधी वर्तमानपत्रात, कधी मासिकात दिसायचे ते बघून बघून मी काढायचे आणि चक्क तीस दिवसात मी तीस चित्रे काढली. विषय एकच असला तरी प्रत्येक चित्र वेगळं होतं. […]