सावरकर सदन आणि अहेवपण
सदनात आता आम्ही रूळू लागलो. इथूनच स्वारींनी हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून आपल्या ध्येयाच्या प्रचारार्थ हिंदुस्थानभर झंझावती दौरे काढले. प्रचार दौऱ्यासाठी जेव्हा भारतभर गरुडभरारी संचार व्हायचा तेव्हा, परत आल्यावर त्या दौऱ्यातील गोड अनुभव, लोकांशी बोलणं होत असताना मला ऐकायला मिळत. अगदी क्वचित मलाही सांगणं होत असे प्रत्येक गोष्ट मला कळावी अशी अपेक्षा मात्र मी कधीच केली नाही. आताही स्वातंत्र्यासाठी चाललेले स्वारींचे ते कष्ट पाहिले की मला अगदी गुदमरायला व्हायचं. […]