नवीन लेखन...

चाणाक्षपणा

साधारण 50 वर्षांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या झवेरी बाजार शाखेत कृष्णादवाला म्हणून प्रमुख प्रबंधक होते. बँकिंग लॉपेक्षा प्रॅक्टीसमध्ये हुशार होते. क्लार्क वर्गात त्यांचा दरारा बरोबर आदरही होता. कोण कामसू, कोण कामचोर ते बरोबर हेरायचे. बँकेतील प्रत्येक विभागाचे त्यांना पूर्ण ज्ञान होते. बुक बॅलंसिंगमध्ये त्यांचा हातखंडा होता. […]

चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते. […]

उपलब्ध पाणी हे कोकण विकासाला सहाय्यक ठरू शकेल काय?

आपल्याजवळ काय नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याजवळ काय आहे, त्याचा आपण आपल्या विकासाठी कसा वापर करू शकतो हे उचित ठरणार नाही का? एक पर्यटनस्थळ निर्माण करणे म्हणजे किमान 100 लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे होय. हा झाला प्रत्यक्ष रोजगार. यापेक्षाही अप्रत्यक्ष रोजगार तर अमाप असतो. […]

ये रे ये रे पैसा

एका ब्रँचला एक पेन्शनर आजोबांचा एवढा विश्वास की, एकदा मी रजेवर होते, तर FD करायला आणलेली एक लाख वीस हजाराची रक्कम परत घरी घेऊन गेले, दुसऱ्या दिवशी मी म्हणाले, ‘काका पैसे नेण्याआणण्याची इतकी जोखीम का घेतली.’ तर म्हणाले, ‘तू नव्हतीस ना, मग मी आपला परत गेलो.’ […]

क्रुझचा अनोखा अनुभव

हल्ली सर्वजण खूप प्रवास करतात. फक्त देशातच नव्हे तर परदेशातही. पुर्वीसारखे परदेशवारीचे अप्रूप आता राहिले नाही. मोठ्या संख्येने मुले-मुली शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी परदेशी जायला लागले. मग त्यांचे आई-वडील मुलीच्या -सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिका युरोपला जायला लागले. […]

आणि मी ज्येष्ठ झाले

म्हातारा नुसता वयानं वाढतो. स्वकेंद्री असतो. वृद्ध हा वय, अनुभव आणि ज्ञानानं वाढतो, पण ज्येष्ठ नकाराला सकारात बदलतो. ती ताकद ठेवतो. अशा लोकांची समाजाला गरज आहे.कारण ज्ञान आणि अनुभव त्यांच्याजवळ आहेच. शिवाय निराशा या लोकांना शिवू शकत नाही. म्हणून तर माझी पणजी ठणठणीत आहे. स्मरणशक्ती दांडगी आहे.’ […]

कोकण समुद्र : त्यातील जीव आणि वनस्पती वैभव

समुद्राचं जग समजून घेण्यासाठीच आपल्याला त्याच्या अधिवासांची ओळख करून घ्यायला हवी. समुद्राचं जग सुरू होतं वाळूच्या किनाऱ्यापासून!  वालुकामय, चिखलयुक्त  किंवा खडकाळ किनारे, किनाऱ्यांवरील खारफुटीची जंगले, खाड्या आणि प्रवाळांचे क्षेत्र हे या सागरी जगाचे महत्त्वाचे भाग. त्या-त्या प्रदेशानुसार इथली जैवविविधता बदलते आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टी ही समृद्ध बनते. […]

माणुसकी

माझी बदली औरंगाबादच्या ग्रामीण शाखेत झाल्यापासून ही पारव्याची जोडी दर महिन्याला एक तारखेला पेन्शन काढण्यासाठी येईल. आजोबा  70 च्या पुढे. बऱ्यापैकी थकलेले आणि आजी 60 च्या आतल्या. अगदी तरतरीत. आजी-आजोबांचा हात धरून त्यांना बँकेत आणत. त्यांना एका  बाकड्यावर टेकवून लगबगीने पैसे काढण्याचा फॉर्म भरून रांगेत उभ्या राहात आणि कॅशिअरकडे त्यांचा नंबर आल्यावर ‘आवो’ असं जोराने ओरडून […]

आम्हा नित्य दिवाळी

अशिक्षित ग्राहकाला ‘सिस्टम बंध है’, ‘कनेक्टीव्हीटी नही है’, ‘अकाऊंट इनऑपरेटीव्ह हो गया’, एखादी गोष्ट ऍक्टिव्हेट करून घे असे सांगण्यापेक्षा ‘थोडी देर के लिये मशीन बंद है, बहोत दिनसे इस्तेमाल नही किया इसलिये खाता अभी रुका हुवा है’ वगैरे ‘त्यांच्या’ भाषेत सांगितल्या तर त्या सोप्या वाटतात. बँकेचे नियम कार्यपद्धती युक्तीने मांडाव्या लागतात.  […]

बँक आणि छोटे उद्योजक

उद्योजक म्हणून यशस्वी व्हायचं असेल तर खरी सहाय्यभूत ठरले, ती बँक उद्योजक आणि बँक यातील अतूट नाते व्यक्त केले आहे ‘त्रिगुण टुर्स’चे प्रवीण दाखवे. […]

1 17 18 19 20 21 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..