मराठीतील प्रवासवर्णनं
मराठी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका बाजूला समुद्र उल्लंघून जाऊ नये, पंचक्रोशीतच रोटी-बेटी व्यवहार करावा, यवनी म्हणजे उर्दू – हिंदी भाषा बोलू नये या सारखी समाजबंधनं त्या काळात होती. ‘महाराष्ट्र देशी वचीजे’ असा महानुभाव पंथात दंडक होता. तरीही नामदेवाचे ‘तीर्थावळीचे अभंग’, मराठ्यांच्या बखरींमधील उत्तर-दक्षिणेकडील चढायांच्या निमित्ताने केलेल्या प्रवासाची वर्णने ही अव्वल इंग्रजी पूर्वकालीन प्रवासवर्णने म्हणता येतात. […]