कोकणातील देवराया
जनमानसाच्या भावनांना हात घालत लोकसहभागातून राखलेली ही जंगले म्हणजे संवर्धनाची मूर्तिमंत उदाहरणेच नाहीत का? मुळात जंगल परिसंस्थेत मानवाने कोणताही हस्तक्षेप केला नाही तर तेथील वनस्पती, कीटक, पक्षी, सरिसृप, प्राणी यांच्या मदतीने अगदी काही वर्षातच तिथे अतिशय संपन्न असा वनपट्टा तयार होतो हे तर सिद्ध झालेलेच आहे. […]