छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम
मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही. […]