खुळखुळणारी नाणी
गुप्तकाळात मातृदेवतांचा उठाव झाल्यानंतर त्यांनाही नाण्यांवर स्थान मिळू लागले. जसे सिंहासनाधिष्ठीत लक्ष्मी किंवा उमा, पार्वती. पुढे मुस्लिम राज्यकर्ते आल्यावर मानवी आकृत्याच गायब झाल्या. एका राजाने खलिफाचे चित्र असलेली नाणी काढली म्हणून असंतोष निर्माण झाला व नाणे मागे घ्यावे लागले. अशा काळात स्त्रियांना कोण स्थान देणार. तरीही एका मुस्लिम राजाने आपल्या रूपवती राणीची जन्मपत्रिकाच नाण्यावर छापली होती. […]