कोकणातील बोली भाषांचे सौदर्य
प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे […]