नवीन लेखन...

व्याधिक्षमत्व आणि कॅन्सर

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याधिक्षमत्व (Immunity) हा विषय सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे . व्याधिक्षमत्वाचा संबंध फक्त कोरोनासारख्या इन्फेक्शनशीच नसून , कुठल्याही रोगापासून शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर उत्तम व्याधिक्षमत्व ही त्याची कवचकुंडले आहेत , मग त्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा अपवाद नाही आयुर्वेदाने व्याधिक्षमत्व हे प्रामुख्याने तीन प्रकारचे सांगितलेले आहे . १. सहज , २. कालज , […]

परशुराम क्षेत्रातले कोकण

वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. त्यांचे नाव परशुराम. […]

कागदी चलनाचा इतिहास

सर्वप्रथम 13 व्या शतकात कागदी नोटा चलनात आल्या. त्यावेळी चीनने या कागदी नोटा चलनासाठी वापरल्या. पण 15 व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या शतकात पश्चिम यूरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बँका विकसित झाल्या. […]

आनंदी ज्येष्ठत्त्वाची सप्तपदी

भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल, खर्या अर्थाने जगण्याचे सार्थक करेल, ते शोधून त्याचा उत्साह, उमेद आणि उर्जेने पाठपुरावा करायला हवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्यातच आपल्या जगण्याचे प्रयोजन असते.ज्येष्ठ होऊनही वृद्धत्त्व टाळायचे […]

मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती

सध्या व्याधिक्षमत्व हा परवलीचा शब्द आहे . कोविड १९ च्या काळात तर याला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे . दिवाळीच्या आनंदाच्या काळात मधुमेहावर बोलणे जरा अवघडच ! पण तरीही ‘ आरोग्यं धनसंपदा ‘ हा मंत्र जपत आपणाला काही काळजी तर घ्यावीच लागणार . व्याधिक्षमत्व म्हणजे शरीराची व्याधीपासून संरक्षण करण्याची शरीराची क्षमता . यालाच Immunity किंवा प्रतिकारशक्ती […]

नाण्यांचा विकास

मुघलांच्या काळात 9 रुपयांची 5 मोहोर व 5 मोहरांचे एक नाणेसुद्धा होते. अकबराच्या काळात नाण्यांमध्ये भरपूर वैविध्य होते. त्यावर राजाचे नाव टांकसाळीचे नाव, हिजरीसन, चार खलिफांची नावे, कलिमा, ईश्वराकडे मागितलेले आशीर्वाद आणि काही नाण्यांवर हिंदू देवदेवता इतके वैविध्य होते. नंतर जहांगीरने 12 राशींची 12 नाणी काढली. 1000 मोहरांपासून 12 किलो वजनाचे सर्वात मोठे नाणे काढले. […]

हृदयरोग आणि व्याधिक्षमत्व

गेल्या ४० ते ५० वर्षांत हृदय रोगाचे प्रमाण खूपच वाढले आहे . गेल्या ४ ते ५ दशकांमध्ये लोकसंख्या खूपच वाढली आहे . तसेच पूर्वी आपल्या देशाचे सरासरी वय होते ३५ वर्षे होती . जसजशा सुधारणा घडत गेल्या , औषधोपचार पद्धतींत खूपच बदल होत गेले व नवनवीन चाचण्या येऊ लागल्या व रोगांचे निदान अचूक होऊ लागले व […]

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल ?

ती माझे सर्वस्व ! ती माझी प्रेरणा ! ती माझी धारणा ! ती माझी शक्ती ! तीच माझी भक्ती ! शक्तीचीही शक्ती तीच तूही ! माझा प्राण तू , माझा श्वास तू , माझा भास तू , अंतरीची आस तू तू माझे जीवन , जीवन झाले पावन , पावन होण्या कारण , कारण माझे मन !! […]

उपचारांची दिशा बरे वाटावे की बरे व्हावे ?

अग्निशेषं ऋणशेषं व्याधिशेषं विशेषतः । वर्धमाने तु वर्धन्ते तस्मात् शेषं न कारयेत् ।। अर्थात पूर्णपणे न विझलेला अग्नि ( आगीची ठिणगी ) , पूर्णपणे न फिटलेले कर्ज आणि विशेषतः उपचार घेऊन पूर्ण बरी न झालेली व्याधी , हे नेहमीच वाढत राहतात ! अर्थात त्यांचा निःशेष अंत झाल्या खेरीज शहाण्या माणसाने स्वस्थ बसू नये. एखादा दहशतवादी हल्ला […]

वॉरेन बफेट गुंतवणुकीचे महागुरू

शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे . एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे . वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या […]

1 30 31 32 33 34 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..