नवीन लेखन...

स्वदेशीची वाटचाल : एक दृष्टिक्षेप

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान […]

कुठून आली व्यंगचित्रे?

एकोणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये बाजाराच्या दिवशी काहीजण पथारी मांडून आल्यागेल्याची व्यंगचित्रे चितारून विकत असा उल्लेख आहे. जेव्हा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रिंटींग मशीनचा शोध लागला तेव्हापासून व्यंगचित्रे नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागली. नियतकालिके त्याअगोदर हस्तलिखित स्वरूपात होती; पण (प्रत्येक कॉपीवर तेच चित्र चितारणे जवळपास अशक्य होते.) पंच, टाइम्स, लाइफ ही प्रिंटिंग मशीनवरची नियतकालिके, व्यंगचित्रे प्रसिद्ध करू लागली. युरोप, इंग्लंड […]

भगूर क्रांतीचे बीजारोपण

कष्ट हीच तर ती शक्ती आहे. जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते. व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये  प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख. […]

पर्यटनातही स्वयंपूर्णतेकडे

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. […]

अभंग:आत्म्याचे चिरंतन तत्त्व

‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते. तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात प्रगट झालेल्या या दोन साक्षात्कारी संतांनी ‘अभंग’ रचनेला प्रथम सुरुवात केली आणि शाश्वत मराठी कवितेची ‘अभंग’वाणी अवकाशभर निनादू लागली. उन्हाचे चांदणे करणारे हे दोन अद्भुत महाकवी अभंग वाङ्मयाचे केवळ निर्माते नव्हते, तर […]

स्वदेशी धर्म आणि ग्राहक धर्म

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला सूर्यकांत पाठक यांचा लेख पूर्वी ‘ईस्ट इंडिया कंपनी ने भारत लुटला. त्याविरोधात आपण लढलो. स्वातंत्र्यानंतर देशी उद्योगांनीही भारताची खरं तर अशीच लूट केली; पण ते ‘स्वदेशी’ उद्योग म्हणून आपण उगीचच त्यांना पावित्र्य बहाल केलं. ‘खा-उ- जा’ धोरणाअंतर्गत पुन्हा विदेशी उद्योग आले, नि त्यांनी लूटच चालू केली. ते […]

ग्राहककेंद्री मानसिकता

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. अविनाश कोल्हे यांचा लेख विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे १९१७ साली रशियात मार्क्सवादी क्रांतीनंतर जगात भांडवलशाहीला सशक्त पर्याय समोर आलाय, असे वातावरण काही वर्ष निर्माण झाले होते. पण १९९० साली सोव्हिएत युनियन पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळल्यानंतर भांडवलशाहीचा विजय झाला, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जगभर झपाट्याने […]

गावगाडा : स्वदेशीचे स्थानिक जनित्र

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. शंकर धडगे यांचा लेख भारत देश हा पूर्वीपासूनच खेड्यापाड्यांनी, वाड्यावस्त्यांनी सामावलेला देश आहे आणि हा देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. या देशात अनेक जाती व धर्माचे लोक पिढ्यान्पिढ्या राहात आहेत. कृषी व्यवसायाशी निगडित अनेक व्यवसाय भारतात प्राचीन काळापासून रूढ आहेत. मनुष्याला अन्न, वस्त्र, निवारा […]

कुटुंब आणि परिवार

माणसामाणसांच्या नात्यातून कुटुंब बनते, तर नात्यांपलीकडील भावनांतून परिवार घडतो. परिवार उमजायला भावनांची गरज असते. कुटुंब आणि परिवार यातील परस्पर भिन्नता, पूरकता विषद करणारा, व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी लिहिलेला लेख […]

स्वदेशीचे बदलते स्वरूप

शब्दांना अर्थ असतो, पण तो सापेक्ष असतो. कधीकधी तो कालसापेक्षही असतो. कोण कायबोलले आणि केव्हा बोलले याला महत्त्व असतेच… स्वदेशी या कल्पनेचे असेच काहीसे रूप दिसते, मात्र त्याचे प्रकटीकरण वेगवेगळे पाहता येते. स्वदेशी ही कल्पना आधी व्यक्तीला पटावी लागते, मगच त्याची अंमलबजावणी पसरू लागते. त्याचा परिणामही हळूहळू पसरू लागतो. […]

1 33 34 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..