ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला श्रीराम कृ. बोरकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.
‘चरित्रे’ या नावाने सुपरिचित असणारे असंख्य ग्रंथ मराठी भाषेत प्रसिद्ध झाले आहेत.
समाजातील एखाद्या महनीय थोर पुरुषाच्या जीवनकार्यासंबंधी दुसराच कुणीतरी जे लिहितो त्या लेखनास चरित्रे असे म्हणतात. आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने महत्पदास पोहोचलेली महान व्यक्ती स्वत:च्या संपूर्ण आयुष्याबद्दल स्वतःच सारे काही सांगते वा लिहिते तेव्हा ते बनते आत्मकथन म्हणजेच आत्मचरित्र.
गेल्या पन्नास वर्षांत वेळोवेळी प्रसिद्ध झालेली आत्मचरित्रे संख्येने जशी बिपुल तशीच त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. अशा निवडक थोड्या आत्मकथनपर साहित्यावर येथे एक धावता दृष्टिक्षेप टाकणे सयुक्तिक ठरेल. कुठल्याही विशिष्ट आत्मचक्तिचा खोल परामर्श घेणे केवळ स्थलमर्यादेमुळेच शक्य नाही. म्हणूनच, प्रस्तुत लेखामध्ये दोन ठळक मुद्यांच्या अनुषंगाने थोडे विवेचन करावे असे वाटते. ते मुद्दे असेः
१. गेल्या पन्नास वर्षामध्ये प्रसिद्ध झालेली निवडक, बैरिध्वपूर्ण आणि बहुचर्चित अशी जी आत्मचरित्रे आहेत, त्यांचा चौफेर वेवगेटाजून केवल उल्लेखावर आणि नामनिर्देशनावरच समाधान मानणे क्रमप्राप्त.
२. थोरामोठ्यांची आत्मचरित्रेसुद्धा सदोष व निकृष्ट उतरली आहेत असे अभ्यासकांचे मत आहे. उत्कृष्ट आणि निर्दोष आत्मचरित्राचे जे काही निकष बहुतांशी सर्वमान्य झाले जाहेत असे वाटते. त्यांच्या संदर्भात काही विचारमंथन करणे विषयोचित ठरेल.
आत्मचरित्र लिहु धजणारी व्यक्ती सर्वच दृष्टींनी मोठी असायला हवी, असा एक शिष्टमान्य संकेत कालपरवापर्यंत लोकमानसात रूढ होता तसा तो आज राहिलेला नाही. तळागाळातल्या अतिसामान्य माणसांचे जीवनानुभवदेखील जिवंत, हृद्य आणि रसरशीत असू शकतात हे वास्तव प्रकर्षाने जाणवेल, अशी एक घटना घडली.
१९७८ सालअखेरीस दया पवार यांनी लिहिलेलं ‘बलुतं’ नामक आत्मकथन उजेडात आल्याबरोबर वाङ्मयीन जगात एक प्रकारची वेगळी लाटच उसळत राहिली. नाना त-हेचे अमानुष अत्याचार व अन्याय सोशीत वर्षानुवर्षे भणंग व बकाल जिणे जगणाऱ्यांमधल्या बंडखोर तरुणांनी स्वतःच्या वेदनांना जाहीर उद्गार दिला. ‘बलुतं’ च्या पाठोपाठ माधव कोंडविलकरांचे ‘मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ नामक आत्मकथन प्रकटले. त्यानंतर ‘आठवणींचे पक्षी’, ‘गावकी’, ‘गबाळ’, ‘अक्करमाशी’, ‘उपरा’ आणि ‘उचल्या’ अशी वेगळी नि अर्थवेधक शीर्षके असलेली आत्मचरित्रे सातत्याने उजेडात येऊ लागली. ‘कोल्हाट्याचे पोर’ हेही त्यातलेच एक, या सर्व पुस्तकांचे सर्वश्री सोनकांबळे, रुस्तम अचलखांब, मोरे, लिंबाळे, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, काळे प्रभृती लेखक, दलित समाजातल्या पीडित व शोषित थरातलेच होते. धनदौलत, मानसन्मान किंवा सामाजिक प्रतिष्ठा यांपैकी नावावर कसलीच जमा नसलेल्या ह्या मंडळीजवळ होते, ते फक्त स्वतःच्या वेदनेला प्रभावी शब्दरूप देण्याचे कसब! तेवढ्या एकमेव भांडवलावर आपल्या सकस आणि तीव्र जीवनानुभवांना वाङ्मयीन पातळीवर शब्दबद्ध करण्यात त्यांना चांगले यश लाभले. एरव्ही ही तथाकथित लहान माणसे साहित्यगुणांच्या संदर्भात मात्र महान ठरली यात संदेह नाही. तळागाळातील उपेक्षितांच्या ह्या आत्मकथनामुळे मराठी साहित्याभोवती वेढा घालून असलेले ‘सदाशिव पेठी’ कुंपण अंमळ सैलावले आणि उच्चभ्रूच्या संकुचित सरहद्दी मोडून पडू लागल्या हे एक सुचिन्हच ठरले. साहित्य-निर्मिती ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी उरली नाही हे बरे झाले!
गेल्या अर्धशतकात ह्याच वर्गातल्या मातब्बर, प्रतिभासंपन्न साहित्यिकांची अनेक आत्मचरित्रे थाटामाटात प्रसिद्ध असतात. इतरांची निर्भत्सना करण्यात अग्रेसर असणारे लोक स्वत:ची निर्भत्सना करीत नाहित. स्वत:ला condemn करणे माणसाला नकोच अअसते! आत्मकथन करणा-याने स्वत:च्या खाजगी किंवा सर्व गोपनीय गोष्टी सांगायलाच हव्यात असा आग्रह अर्थातच नसतो, तथापि तुम्हीच स्वत:हून स्वत: जे काहि सांगता/लिहिता तरी पूर्ण सत्य सांगा, अपेक्षा सांगूच नका तेव्हढेच म्हणणे असते. मराठीतील आजवर प्रसिद्ध झालेल्या फारच थोड्या आत्मचरित्रांनी ही किमान अपेक्षा चांगली पूर्ण केलीच, इतकेच या संदर्भात नमूद करतो.
असे का घडावे ? यामागे तीन काररणे उघडच दिसतात. आत्मवंचना, आत्मश्लाघा आणि आत्मसमर्थन या त्रिदोषांचा नको तेव्हढा संसर्ग झाल्यामुळे, अनेक थोर व्यक्तींची आत्मकथने वाड्मयीन पातळीवर हिणकस ठरल्याची उदाहरणे आहेत. येथे त्याबाबत केवळ विस्तारभयास्तव जास्त चर्चा करता येत नाही, हे लक्षात घ्यावे.
प्रस्तुत लेखामध्ये, जीवनातील अन्य क्षेत्रांतल्या काही नामवंतांच्या आत्मचरित्रांचाही उल्लेख करणे जरुर होते याची जाणीव आहे. आत्मचरित्रांमधून त्या त्या संबंधित थोरांप्रमाणेच त्यांच्या विशिष्ट काळातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचे आणि तज्जन्य विचार प्रवाहांचेही सम्यक दर्शन घडत असते. त्या दृष्टीने प्रत्येक मोठ्या व्यक्तीच्या आत्मचरित्राला ऐतिहासिक दस्तावेजांचे परिणाम लाभत असते हाही एक फायदाच होय!
काळ अनंत आहे आणि मानवी प्रज्ञा-प्रतिभेला नित्य नवी शिखरे खुणावीत आसतात. तेव्हा ‘उद्या’ च्या एखाद्या थोर व्यक्तीचे अधिकाधिक निर्दोष आणि प्रेरक असे सवर्वत्कृष्ट आत्मचरित्र मराठीमध्ये अवतीर्ण होईलही. नाही का म्हणावे?
— श्रीराम कृ. बोरकर
Leave a Reply