सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट हा त्यावेळी लक्षात राहिला तर तो त्याचा खेळामुळे, बिन्धास बोलण्यामुळे आणि कॉन्टॅक्ट लेन्स मुळे ….
मला आठवतंय भारतात तो खेळत असताना त्याची कॉन्टॅक्ट लेन्स पडली, ती आणण्यासाठी तो इंग्लंडला गेला आणि परत आला …लहानपणी पेपरला वाचलेले आज आठवले.
त्याला भेटण्याचा नंतर दोन-तीन वेळा प्रसंग आला….त्याच्या ऑटोग्राफ्स घेतल्या. त्याची ती हॅट आणि मस्किल बोलणे……कधी कुचकट देखील…..त्याचे रेकॉर्डस् , त्याचे खेळणे , फलंदाजी करताना खडूसपणे मैदानाला चिटकून रहाणे आज सगळे आठवले….
माणूस एकदम भारी….१०८ कसोटी सामन्यात ४७.७२ च्या सरासरीने ८,११४ धाव केल्या त्यामध्ये त्याने २२ शतके आणि ४२ अर्धशतके केली…सर्वात जास्त धावा नाबाद २४६ धावा.
पहिला कसोटी सामना खेळला तो ४ जून १९६४ रोजी ऑस्टेलिया विरुद्ध तर शेवटचा कसोटी सामना खेळला तो १ जानेवारी १९८२ भारतीय संघाविरुद्ध.
— सतिश चाफेकर
Leave a Reply