नवीन लेखन...

आवडीचे गैरसमज

लेकीने भेटायला येतांना आईला आवडतात म्हणून जांभळं आणि थोडी काळी मैना आणली होती ती घेऊन नातवंडा सोबत ती गॅलरीतील मोकळ्या जागेत बसून आनंदाने खात होती. हे पाहून ती भावजयीला नेहाला बोलायला किचन मध्ये गेली. नेहमीच नेहा असे वागते. आज तिचा गैरसमज दूर करण्यासाठी ती किचन मध्ये आली होती.
नेहा अग मला माहित आहे की तुला काय वाटते ते. तुम्ही सगळे तिच्या साठी खूप काही करता पण आम्हा बहिणींना रोज जमत नाही म्हणून असा रानमेवा आईला खूप आवडतो म्हणून आणते मी. तुला माहीत आहे का तिच्या लहानपणी याच गोष्टीची मुबलकता. होती आणि सगळ्याच्या घरी हेच आणायचे.
सर्वांनाच बिस्कीट चॉकलेट असे काही मिळत नव्हते. त्यामुळे आम्हाला देखील हा रानमेवाच जास्त खाऊ घातला होता. बाबांना याची आवड नव्हती पण आई आमच्या साठी पण भरपूर आणायची. ऊस सोलून खा अशी सक्ती होती तिची. तरीही आमच्या पैकी दोघांनाच रानमेवा आवडतो. आणि प्रत्येक पदार्थ घरीच करून घालण्याची आवड आणि हौस होती म्हणून बाहेरचे तिला आवडत नाही म्हणून तू नाराज आहेस. आणि आता हे दोन पिढीतील अंतर कमी करता येत नाही. पण ती तुमच्या वर बंधन लादत नाही. बाबा बाहेर गावी शिकायला होते म्हणून त्यांना बाहेरचे आवडते यात त्या दोघांची तुलना शक्य नाही. आमच्या लहानपणी पण आई सगळ्यांना जे जे आवडते ते ते करुन द्यायची. कधीच कंटाळा केला नाही. म्हणायची प्रत्येकाची आवड वेगळी असते म्हणून आपलेच बरोबर असा हट्ट धरला जाऊ नये….
या उलट माझ्या सासुबाई शहरातच वाढल्याने बाहेरचे म्हणजे अगदी हातगाडीवरचे आवडीने खातात. फ्रिज मधील पाणी. घरात गाऊन बाहेर जातांना पंजाबी ड्रेस घालतात. हा सगळा भाग सवयीचा व परिस्थितीचा असतो. माझ्या दिराला आंबा अजिबात आवडत नाही म्हणून आम्ही त्यांना आमरस वाढत नाही. त्यांच्या साठी दुसरे काही तरी त्यांच्या आवडीचे गोड करून देतो. आईच्या आवडी बद्दल तू नाराज होणे सहाजिकच आहे. म्हणून गैरसमज करून घेऊ नकोस. अग तिच्या बाबतीत तुला वाटते ना की आईला काही करुन दिले किंवा आणले तरी ती नाराजच असते. पण असे नाही. ज्या दिवशी तिच्या आवडीचे होते ती लगेचच आम्हाला फोन करून कळवते. तुला एकदा अनुभव आला होता ना?तुझ्या मैत्रिणीकडे कसली तरी पार्टी होती. तिथे तिला काही पदार्थ आवडले होते म्हणून तिने लगेचच तुझ्या मैत्रीणीला बोलून दाखवले होते. ती किती खुश झाली होती हे तूच मला सांगितले होते. आणि मला खात्री आहे की ज्या दिवशी तिला तुझ्या हातचे काही आवडले की ती लगेच तुला सांगत असेल. आणि नसेल तर बोलणार नाही फक्त तो पदार्थ खाणार नाही. हे बघ नेहा काही वर्षांनी आपल्या बाबतीतही असेच होणार आहे म्हणून मनातील गैरसमज दूर कर आणि तिच्या मनासारखे तिला खाऊ दे. तुम्ही आणू शकत नाहीत म्हणून मी आणते हाही गैरसमज करून घेऊ नकोस. फार दिवसापासून मला वाटत होते ते मी आज बोलून दाखवले आहे. याचाही राग धरु नकोस. जुन्या विचारसरणीच्या लोकांनी बॅकफूटवर रहावे. सकारात्मक बदल करावा असे म्हणणे सोपे आहे पण वागणे अवघड असते. शेवटी काय तर आपण त्यांच्या शेवटच्या काळात गैरसमज करून दुखवू नये. सून म्हणून असो की लेक म्हणून असो.
नेहालाही बर वाटल. बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा.
— सौ कुमुद ढवळेकर.

1 Comment on आवडीचे गैरसमज

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..