आभाळ ढगांनी
दाटलेले होते,
पावसांच्या सरी
कोसळतील
या आशेने
सारे सिवार
बहुरंगी नटलेले होते.
नांगरण – कुळवनाने,
माती आता
चांगलीच पेटली होती,
लाले-लाल
मातीची आग,
आता तळपायातून
मस्तकी पोहचली होती.
खर्चाचे डोंगर,
आता चांगलेच
जीवावर बेतले होते,
बेताल जीवनाने
मरनोत्तर गोष्टीत
आज चांगलेच
रस घेतले होते.
दऱ्या – खोऱ्यातून
नदी- नाल्यातून
तळी – ओढ्यातून
आपुलकी, जिव्हाळ्याचे
पाणी….
आता बऱ्यापैकी
आटले होते.
कठोर – निर्दयी
दुष्ठ – नीतीने
सुख – दुःखाला
मधो – मध
चिरले होते.
पाखंडी, भ्रष्ट
झुंड, शंड
ठोक, बिनडोक
मनमानी, मनोवृत्तीने
सुव्यवस्थेस,
आता चांगलेच
घेरले होते.
मळे, धन–दांडग्याचे,
आता चांगलेच
फुलले होते,
अवकाळाने
झोडपले तरी,
व्यवस्थेने मात्र..
हात जोडले होते.
दुःखाचे धनी,
नशिबाने चांगलेच,
होरपळले होते,
कितीही हात
जोडले तरी,
व्यवस्थेने पायदळी
तुडविले होते.
न्यायाचेच हात
आज डोळ्यादेखत ,
रक्ताने माखलेले होते,
भ्रष्ट नोकरशाहीपुढे, आज
सत्य हि झुकलेले होते…
– ©️ प्रा. शिवाजी आर. कांबळे (कवि, लेखक, संमिक्षक, संपादक, गीतकार)
☎️ मो.न.8830800335 ================================
Follow me on my Blog ID: https://kshivraj83.blogspot.com/ ================================
Leave a Reply